आधारकार्ड धान्य वाटपातून जिल्हा वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:23 PM2018-02-14T22:23:43+5:302018-02-14T22:24:19+5:30

भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे १०० टक्के आधारकार्डाशी जोडणी न झाल्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आधारकार्ड प्रमाणे धान्य वाटप कार्यक्रमातून जिल्हा वगळण्यात यावा.

Skip district from allocation of Aadhar card | आधारकार्ड धान्य वाटपातून जिल्हा वगळा

आधारकार्ड धान्य वाटपातून जिल्हा वगळा

googlenewsNext
ठळक मुद्देलिंक फेलमुळे ग्रामीण भागाला फटका : शिधापत्रिका आधारकार्ड जोडणीला विलंब

आॅनलाईन लोकमत
तुमसर : भंडारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे १०० टक्के आधारकार्डाशी जोडणी न झाल्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या आधारकार्ड प्रमाणे धान्य वाटप कार्यक्रमातून जिल्हा वगळण्यात यावा. या संबंधिचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार तुमसर यांना देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात आधार कार्ड शिधापत्रिकेशी जोडणीचे कामे सुरू आहेत. मात्र जोडणीकरिता ग्रामीण भागात नेटवर्कचा बोजवारा उडाला असल्यामुळे सतत लिंक फेल राहते. परिणामी सदर कामास विलंब होत असून शंभर टक्के जोडणी आणखी काही महिन्याचा अवधी लागणार आहे. परंतु शासनाने प्रायोगिक तत्वावर आधार कार्ड जोडणी प्रमाणे धान्याचे वाटप करण्याकरिता भंडारा जिल्हा समाविष्ठ करण्यात आला आहे. १०० टक्के जोडणी न झाल्यामुळे शिधापत्रिकाधारकांशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्याला वगळण्यात यावे, असे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमोरे यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांना देण्यात आले. यावेळी गुलराजमल कुंदवानी, भुपत सार्वे, ठाकुरदास वासनिक, भाऊराव चौरीवार, सुरेंद्र मेश्राम, सुरेश मेश्राम, लक्ष्मीकांत बडवाईक, प्रभाकर पारधी, खुमन शरणागत, शेखर खेताडे, विनोद वासनिक आदी उपस्थित होते.

Web Title: Skip district from allocation of Aadhar card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.