पळस वृक्षाची कत्तल पर्यावरणाला घातक
By admin | Published: September 12, 2015 12:32 AM2015-09-12T00:32:00+5:302015-09-12T00:32:00+5:30
वर्षभर मानेवर भार सोसत बैल शेतात राबत असतात. त्यांना थोडा आराम मिळावा आणि रापलेली त्यांची मान शेकली जावी,
पळस वृक्षाची कत्तल पर्यावरणाला घातक
बैलांची खांद शेकण्यासाठी खरा वापर
वर्षभर मानेवर भार सोसत बैल शेतात राबत असतात. त्यांना थोडा आराम मिळावा आणि रापलेली त्यांची मान शेकली जावी, यासाठी पोळा सणाला बैलांना पूर्णत: आराम दिला जातो. लोणी गरम करून त्यात हळद टाकून पळसाच्या फांद्यांनी बैलांची मान शेकली जाते. याला खांद शेकणे असे म्हणतात आणि त्यासाठीच पळसाचा उपयोग केला जातो. परंतु घरी बैलजोडी नसलेले शेतकरीही आता एक मान म्हणून मातीच्या बैलाची पूजा करून ही परंपरा जोपासतो.
४परंपरा या जोपासण्यासाठीच असतात. परंतु काळानुरूप त्यात बदल होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे पळस वृक्षाची मोठी फांदी तोडण्याऐवजी तीन पानांची लहान फांदी दारासमोर लावून ही धार्मिक परंपरा जोपासली जावू शकते.
४पळसाच्या आयुर्वेदातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु त्याचा विचार न करता त्याची कत्तल होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.