झुडपी जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:04 PM2019-05-12T22:04:49+5:302019-05-12T22:05:39+5:30
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वनविभागाद्वारे वुक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने नागरीक वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेत आहेत. परंतु ज्यांच्या खांद्यावर वृक्षसंवर्धन व वनसंरक्षणाची जवाबदारी आहे, त्याच वनविभागातील वनअधिकारीच वनसपंदेची कत्तल करुन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ...........
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वनविभागाद्वारे वुक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने नागरीक वृक्षलागवडीसाठी पुढाकार घेत आहेत. परंतु ज्यांच्या खांद्यावर वृक्षसंवर्धन व वनसंरक्षणाची जवाबदारी आहे, त्याच वनविभागातील वनअधिकारीच वनसपंदेची कत्तल करुन आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बहुमौल्यवान झाडे ठेकेदाराच्या स्वाधीन केल्याने ठेकेदाराने खुलेआम मौल्यवान झाडाची कत्तल करून विक्री केल्याची घटणा कांद्री वनपरिक्षेत्रधिकारी यांच्या कृपादृष्टीने घडल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
कांद्री वनपरिक्षेत्रामध्ये वनपरिक्षेत्रधिकारी यांचा वरदहस्तामुळे खाजगी वृक्षतोड करणारे कंत्राटदार सध्या मोठ्या प्रमाणात सतर्क झाले आहेत. खुलेआम वृक्षकटाई सुरू आहे. त्यामुळे कांद्री वनपरिक्षेत्रातील वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय लोहारा अंर्तगत येणाऱ्या वनबिट सोरणा तलावाजवळील गट क्र.५२ झुडपी जंगलातील ८ सागवन जातीचे मौल्यवान झाडे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मजीर्तील एका लाकूड कंत्राटदाराने दिवसाढवळ्या अवैधपणे झाडे कापुन इतरत्र शेतातील घेतलेल्या झाडांच्या खसºयामध्ये सामिल करुन परस्पर विक्री केल्याचा प्रताप वनअधिकाऱ्यांच्या सहकार्याने लाकुड कंत्राटदाराने केला.
याप्रकरणाची माहिती वृक्षप्रेमींनी वनपाल सहाय्यक गोलीवार यांना दिली, परंतु यामध्ये वनपालाचे हात आधीच कंत्राटदाराने ओले करून दिल्याने त्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून कर्तव्यात कसुर केले.
शेतातील झाडे शेतकºयांकडुन खरेदी करून वनविभागाची रितसर परवानगी घेऊन वुक्षतोडी केली जाते, परंतु वरिष्ठ वनअधिकारी ठेकेदाराच्या दिमतीला असल्याने शेतातील कमी व शासकीय जागेतील जास्त झाडे कापुन काळ्याचे पांढरे करण्याचे काम वनपरिक्षेत्रधिकारी यांच्या मार्फत कंत्राटदार करित आहे. या गोरखधंद्यात वनअधिकाºयांची मुकसमंती आहे. वनाचे रक्षकच वनमाफीया झाल्याने वनाच्या संरक्षण व संवर्धनाचा बिकट प्रश्न निर्माण झाले आहे. वनअधिकारी हातचे काम सोडून तत्परतेने जावून झाडांची कोणत्याही प्रकारची पाहणी व चौकशी न करता प्रकरण मंजुर करतात, त्यामुळेच खाजगी जागेच्या नावावर ईतर शासकीय जागेतील मौल्यवान झाडाची विल्हेवाट लावुन ठेकेदारासह वनपरिक्षेत्रधिकारी मालामाल होत आहेत. कांद्री वनपरिक्षेत्रामध्ये बहुतांश ठिकाणी शासकीय जागेतील झाडे खुल्लेआम कापुन नियमबाह्य पद्धतीने विक्री सुरू आहे. त्यामुळे सोरणा व ईतरही ठिकाणातील अवैध कापलेल्या मौल्यवान वुक्षतोडीची वरीष्ठ वनअधिकाºयांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी गावकरी व वृक्षप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली आहे.
राजकारणातुन खोटे आरोप लावण्यात आले आहे. तक्रारीनंतर सरपंच, वन समिति अध्यक्ष, वन मजूरा समक्ष चौकशी केली असता, कापलेले झाड़े गावठाणातील खाजगी जागेतील आढळले. तेथून जंगल दीड कि मी दूर आहे, लग्न कार्य असल्याने वृक्ष मालकने झाड़े तोडल्याचे निष्पन्न झाले. सदर खोटी तक्रार द्वेष भावनेतून करण्यात आली आहे.
-देवेंद्र चकोले, वन परिक्षेत्राधिकारी, कांद्री क्षेत्र