नोटांनी उडविली झोप
By admin | Published: November 11, 2016 12:52 AM2016-11-11T00:52:36+5:302016-11-11T00:52:36+5:30
जिल्ह्यातील नागरिकांची ५०० व १००० रुपयांच्या नोटांनी झोप उडविली आहे. बँक केव्हा उघडेल व केव्हा व्यवहार होतील यावर नागरिकांचे लक्ष लागून होते.
भंडारा : जिल्ह्यातील नागरिकांची ५०० व १००० रुपयांच्या नोटांनी झोप उडविली आहे. बँक केव्हा उघडेल व केव्हा व्यवहार होतील यावर नागरिकांचे लक्ष लागून होते. भंडारा बाजारपेठेत सकाळपासून शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजता नंतर नागरिकांच्या हाती कॅश आल्यावर बाजारात रेलचेल वाढली. खाजगी रुग्णालयात ५०० व १००० रुपयांची नोट घेण्यास नकार दिला जात होता. सार्वजनिक ठिकाणी विशेषत: बसस्थानक परिसरात आॅटो रिक्षाचालक, पानटपरी, लहान उपहारगृह यात नागरिकांची वर्दळ असली तरी सुट्या पैशासाठी वाद होतांना दिसून आला. विज वितरण कंपनीने सुटीच्या दिवशीही विज बिलाचा भरणा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच बँकांना बुधवारी सुटी असल्याने विज बिल भरण्यासाठी ग्राहकांना एक दिवससमोर सवलत देण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशीही पेट्रोलपंपावर सुट्या पैशासाठी दादागिरी पाहायला मिळाली. चित्रपटगृहात नेहमीप्रमाणे रेलचेल नव्हती. आजही सर्व एटीएम बंद होते. (प्रतिनिधी)