क्वारंटाईन कक्षात झोपणे शिक्षकांना महागात पडले; भंडारा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 09:52 AM2020-05-11T09:52:39+5:302020-05-11T09:55:11+5:30
क्वारंटाईन कक्षात झोपणे दोन शिक्षकांना चांगलेच महागात पडले. तहसीलदारांच्या तक्रारीवरुन भंडारा जिल्ह्यात मोहाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर क्वारंटाईन कक्षात गैरहजर असलेल्या पंचायत समिती सदस्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्वारंटाईन कक्षात झोपणे दोन शिक्षकांना चांगलेच महागात पडले. तहसीलदारांच्या तक्रारीवरुन मोहाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर क्वारंटाईन कक्षात गैरहजर असलेल्या पंचायत समिती सदस्यावरी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या भवनात क्वारंनटाईन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रावर करडी शाळेचे शिक्षक एस.डी. आडे, आंधळगाव शाळेचे शिक्षक बी. ए. गजभिये आणि मोहाडी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता आर.बी. दीपटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवार १० मे रोजी तहसीलदारांनी सदर क्वारंटाईन केंद्राला भेट दिली. तेव्हा दोन्ही शिक्षक झोपलेले आढळले, तर स्थापत्य अभि. सहा. हे गैरहजर असल्याचे निदर्शनात आले. कामात हयगय केल्याप्रकरणी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे कलम ५५,५६ व भादवि चे कलम १८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.