आकोट येथील झोपडपट्टीवासीय भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:00 AM2020-07-27T05:00:00+5:302020-07-27T05:00:02+5:30

ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.

The slum dwellers in Akot are suffering in hell | आकोट येथील झोपडपट्टीवासीय भोगताहेत नरकयातना

आकोट येथील झोपडपट्टीवासीय भोगताहेत नरकयातना

Next
ठळक मुद्देपथदिवे बंद : नागरी सुविधापासुन वंचित, नाली, रस्ते, बोअरवेलची समस्या, घर टॅक्स घेणे केले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : पवनी तालुक्यातील आकोट ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने आकोटटोली येथे खुल्या जागेत ३० कुटुंब १९९० पासुन झोपड्यामध्ये वास्तव करीत आहेत. ग्रामपंचायतने त्यांचे घर कर बंद केल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना पासुन वंचित राहावे लागत आहे. झोपडपट्टी वसाहतीत नाली, रस्ते, दुर्लक्षीत असुन, बोरवेल, पथदिवे वर्षभरापासुन ग्रामपंचायतीच्या उदासिन धोरण व काही राजकाणाने झोपडपट्टीवासीय नरकयातना भोगत आहेत. त्यांना मालकी हक्काचे पट्टे दयावे, अशी मागणी पवनी तालुक्यातील आकोट येथे भुमिहिन गरजु कुटुंबात जागाची कमी अशांची १९९० पासुन ३० झोपडपट्टीयांचे वास्तव आहे.
स्मशानभुमी शेजारी राहुन दहशतीत जीवन जगत आहेत. शासनाने त्यांचेवर दंडही ढोकले. त्यांनी पोटाला मारुन दंडही भरले. ग्रामपंचायतने झोपडपट्टीतील नागरिकांची अवस्था पाहून त्यांना नळ योजना, बोअरवेल, विद्युत पुरवठा त्यांच्या नागरी सुविधा पुर्ण केल्या. घरटॅक्स व ग्रामपंचायतीमधील दस्तऐवज बंद केल्याने त्यांना शासनाच्या योजनांना मुकावे लागत आहे. त्यांना अनेकदा झोपडपट्टी खाली करा, अशा आशयाची नोटीसाची दटावणी देवून झोपडपट्टी वासीयांवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे कुठे जावे, हा प्रश्न त्यांना निर्माण झाला आहे.
झोपडपट्टी वसाहतीमध्ये माखलेले रस्ते, तुडुंब भरलेल्या नाल्या, बंद पथदिवे, नळ लाईन असुन त्यांना कनेक्शन न देणे, शौचालय बांधकामांना परवानगी न देणे अशा एक ना अनेक समस्यांचा डोंगर वसाहतीमध्ये आहेत. या समस्यांने पुर्णत: झोपडपट्टीवासीय हतास होऊन नरकयातनेत जीवन जगत आहेत. समस्येवर वार्डातील किंवा गावताील एकही पुढारी त्यांचा न्याय मागणीसाठी पुढाकार घेत नसल्याने त्या झोपडपट्टीवासीयांना ग्रामपंचायतने वाडीतच टाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्रस्त झोपडपट्टी वासीयांनी शासनाला निवेदन देवून दोषीवर कारवाही करण्याची मागणी सुनील सुर्यवंशी, दामोधर देशमुख, चैतराम क्षिरसागर, प्रभाकर गायधने, बबलु बिलवणे, मुखरु दहिवले, सोनु भुरे, आशा देवगिरकर, राजु बिलवणे, शकुंतला बिलवणे आदींनी केली आहे.

शासनाच्या आदेशाला केराची टोपली
२०११ पूर्वी करण्यात आलेले अतिक्रमण नियमाकुल करण्याचे आदेश जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले. मात्र आकोट ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाही केलेली नाही. त्यांना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
कागदावर गाव हागणदारी मुक्त
स्वच्छ भातर अभियानांतर्गत प्रत्येक गावात अतिक्रमण धारकांना शौचालयाचा लाभ देण्यात आले. मात्र आकोट ग्रामपंचातयीने झोपडपट्टी वसाहतीमध्ये एकालाही शौचालयाचा लाभ न देता गाव हागणदारी मुक्त असल्याचा कोरम पुर्ण केला. मात्र झोपडपट्टीवासीय आजमितीलाही उघड्यावरच शौचालयाला जात असल्याने त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार ग्रामपंचायतवर कडक कारवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सदर जागा ही ढोरफोडी व खातखुड्याची जागा आहे. या जागेतुन शेतशिवारात जाणारा मार्ग आहे. ही जागा गाव विकासात्मक येणाºया बांधकामासाठी आरक्षीत ठेवली आहे. तसे झोपडपट्टीवासीयांनी ग्रामपंचायतला लेखी स्टॅम्प पेपरवर लिहूनही दिले आहे. जेव्हा ग्रामपंचायतला जागेची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही जागा खाली करुन देऊ.
- मनिषा गजभिये,
सरपंच आकोट

Web Title: The slum dwellers in Akot are suffering in hell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.