पावसाळ्यातही लहान, मोठे प्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:07 AM2019-07-20T01:07:06+5:302019-07-20T01:07:38+5:30

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.

Small and big projects thirsty during monsoon | पावसाळ्यातही लहान, मोठे प्रकल्प तहानलेलेच

पावसाळ्यातही लहान, मोठे प्रकल्प तहानलेलेच

Next
ठळक मुद्दे१४ टक्केच जलसाठा : शेतकरी संकटात, अनेक गावांत जलसंकट

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.
शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघु पाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ १४़०३ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २़६५४, बघेडा ३०़०१, बेटेकर बोथली आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा १२.४२ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ८.८२ टक्के आहे़ जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १७़९२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी दि़ १९ जुलै रोजी ६३ प्रकल्पात ३८़८७ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ३०़२० एवढी होती.
१२ प्रकल्प कोरडे तर काही प्रकल्पात मृतसाठा
पावसाळ्याचे जून, जुलै महिन्यात पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. ६३ प्रकल्पापैकी १२ प्रकल्प कोरडे असून बहुतांश प्रकल्पात मृतसाठा आहे. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिल्याने शेतकºयांवर अस्मानी संकट ओढावले आहे. जिल्ह्यात अनेक गावात आजही जलसंकट कायम असून पाण्यासाठी वनवण भटकण्याची वेळ आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी १८ टक्के पाऊस कमी बरसला आहे.

Web Title: Small and big projects thirsty during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.