स्मार्ट ग्राम पुरस्कार गावाला समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:05 AM2021-02-18T05:05:37+5:302021-02-18T05:05:37+5:30
भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुंदर गाव पुरस्कार हरदोली (झं ) गावाला जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी ...
भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुंदर गाव पुरस्कार हरदोली (झं ) गावाला जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांच्या हस्ते ग्रामपंचायत सरपंच सदाशिव शिवाजी ढेंगे व ग्रामसेवक गोपाल बुरडे यांना पुरस्कार देण्यात आला. ५४७ ग्रामपंचायतींपैकी ७ गावाला पुरस्कार देण्यात आले. माजी गृहमंत्री आर. आर. (आबा )पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यावेळी जिल्हापरिषद ग्रामपंचायत विभाग विस्तार अधिकारी बोरकर हजर होते. राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांची प्रेरणा घेऊन गावाचा विकास साधला जात आहे. हरदोली ग्रामला पुरस्कार मिळाल्याने आपण आनंदी असून शासनाने आमच्या कामाची दखल घेतली. हा पुरस्कार गावातील प्रत्येक जनतेला मिळाला असल्याचे मी समजतो. त्यामुळे पुरस्काराचे गावकरी आहेत असे सरपंच सदाशिव ढेंगे यांनी सांगितले. विस्तार अधिकारी तेलमासरे साहेब, ग्रामसेवक गोपाल बुरडे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, तंमुस अध्यक्ष, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आणि ग्रामवासी यांनी सहकार्यात हातभार लावला.