वडद ठरतोय ‘स्मार्ट ग्राम मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:50 AM2018-05-04T00:50:05+5:302018-05-04T00:50:05+5:30

आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेली वडद ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामचे मॉडल म्हणून तालुक्यात पुढे आली आहे. या ग्रामपंचायतने लोकसहभागातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करुन विकासाची पाऊले टाकले आहे.

'Smart Village Model' | वडद ठरतोय ‘स्मार्ट ग्राम मॉडेल’

वडद ठरतोय ‘स्मार्ट ग्राम मॉडेल’

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत व लोकसहभागाचे फलीत : गावात विविध योजनांची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगाव पंचायत समिती अंतर्गत असलेली वडद ग्रामपंचायत स्मार्ट ग्रामचे मॉडल म्हणून तालुक्यात पुढे आली आहे. या ग्रामपंचायतने लोकसहभागातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम कार्यान्वित करुन विकासाची पाऊले टाकले आहे.
सरपंच किशोर रहांगडाले यांच्या पुढाकाराने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण कार्याला गती देण्यात आली आहे. वडद येथील १ हजार ८८ लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांसाठी मूलभूत योजना कार्यान्वित करुन स्वराज्य ग्रामची संकल्पना समोर आणण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वच्छता अभियाना अंतर्गत कचऱ्याचे नियोजन, पाणी टंचाईवर उपाययोजना, शौचालयांचे बांधकाम, नियोजनात यशस्वी पाऊल, दलित वस्ती सुधार योजनेतील प्रकल्पाला पूर्ण गती देणे, वृक्ष लागवड व संवर्धनात नागरिकांचा सहभाग, स्वच्छ सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी प्रकल्प निर्मिती, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्र्य निर्मूलन उपक्रमांची नियोजने, क्रांति ज्योती महिला सक्षमीकरण प्रकल्प, यशोगाथा अंतर्गत परंपरागत शेती करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील शेतकºयांना मग्रारोहयो योजनेतून गांडूळ खत युनिटचे लाभ मिळवून शेत पिकांसाठी खत निर्मितीची संकल्पना हाती घेतली आहे.
लोकसहभागातून परसबाग लावण्याकरिता भाजीपाला बियाण्यांचा उपयोग करुन १५० लाभार्थ्यांच्या पुढाकाराने परसबाग फुलविण्यासाठी प्रत्येकी एक मिनीकेट तयार करुन लवकी, काकडी, मिरची, टमाटर, वांगी इत्यादी भाज्यांची उत्पादने घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत मालाला ग्राहकांच्या पसंती दिली.घरातील सांडपाणी वाचविण्यासाठी शोषखड्डे तयार करुन पाण्याचे पुनर्रभरण करण्यात आले. पशुपालकांना गोपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन या व्यवसायांतून आर्थिक संपन्नता यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
वडद ग्रामपंचायतमधील सदस्य व लोकसहभाग गावविकासात मैलाचे दगड ठरत आहे. सरपंच रहांगडाले, ग्रामसेवक सी.एस. वैद्य यांच्या संकल्पनेतून स्मार्ट ग्रामसाठी पुढाकार घेतल्याने वडद गाव तालुक्यात इतर ग्रामपंचायतींकरिता मॉडल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे या मॉडल गावाने अगोदरच तालुक्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्पर्धेत उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिक शासनाकडून मिळविले आहे.

Web Title: 'Smart Village Model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.