पालांदूर येथे डास नियंत्रणाकरिता धूर फवारणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:15+5:302021-08-14T04:41:15+5:30

पालांदूर : वातावरणातील बदलामुळे डासांची उत्पत्तीत वाढ झालेली आहे. त्यामुळे पालांदूर व परिसरात डेंग्यू, मलेरिया आदीसह व्हायरल आजारांचे प्रमाण ...

Smoke spraying for mosquito control at Palandur! | पालांदूर येथे डास नियंत्रणाकरिता धूर फवारणी !

पालांदूर येथे डास नियंत्रणाकरिता धूर फवारणी !

Next

पालांदूर : वातावरणातील बदलामुळे डासांची उत्पत्तीत वाढ झालेली आहे. त्यामुळे पालांदूर व परिसरात डेंग्यू, मलेरिया आदीसह व्हायरल आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. डेंग्यूचे रुग्ण पालांदूरात आढळले. गावातील ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी वारंवार ग्रामपंचायतला धूर फवारणी करण्याची मागणी केली होती. याची ग्रामपंचायतीने दखल घेत गावभर यांत्रिक मशीनच्या माध्यमातून धुरळणी केली.

पावसाळ्याचे दिवस असले तरी पाऊस बेपत्ता आहे. उष्ण दमट हवामानामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पशुपालकांच्या घरी तर डासांची संख्या सुमार आहे. दाट लोकवस्तीत डास मोठ्या प्रमाणात आढळतात. डासांच्या नियंत्रणाकरिता आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने पाउले उचलत फाॅगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणी केली. धुरळणीमुळे डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येते. अगदी सायंकाळी गावात धुरळणी सुरू आहे. यामुळे पालांदूर येथे डासांची उत्पत्ती कमी होऊन रोगराई नियंत्रित करण्यासाठी मोठी मदत शक्य आहे.

चौकट

मशीनचा आवाज खूप मोठा असतो. धुरळणीचा वेग जेवढा अधिक तेवढे लांब धुरळणी करिता मदत होते. नुसत्या औषधांच्या वासाने डास कमी होण्यास मदत शक्य आहे. आरोग्य विभागातून पुरविलेल्या औषधीचा वापर मशीनच्या माध्यमातून केला जातो. पेट्रोल व डिझेल यांचा वापर यात केला जातो. गल्लीबोळात धूळ उडवत डास नियंत्रित करण्याकरिता पालांदूर ग्रामपंचायतचे प्रयत्न स्तुत्य आहे. नेहमी करताच ग्रामपंचायतने धूळ फवारणी यंत्र खरेदी केले आहे.

कोट

वातावरणातील बदलामुळे दरवर्षीच पावसाळ्याच्या दिवसात डासांची उत्पत्ती त्रासदायक ठरते. डेंग्यू, मलेरिया यासारखे धोकादायक आजारापासून गावकऱ्यांना त्रास होऊ नये, याकरिता धूळ फवारणी सुरू केली आहे. गावात जेव्हा गरज पडली तेव्हा धूळ फवारणी केली जाईल. नागरिकांनी स्वतःचा घर व परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता पुढाकार घ्यावा.

पंकज रामटेके, सरपंच, पालांदूर

Web Title: Smoke spraying for mosquito control at Palandur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.