स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:04+5:302021-09-07T04:42:04+5:30
भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती तथा मानवतेचे उपासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस स्थानिक स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव /स ...
भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती तथा मानवतेचे उपासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस स्थानिक स्नेहा कन्या विद्यालय पिंपळगाव /स या शाळेत साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका गीता बोरकर या होत्या. डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शाळेचं एक दिवशीय प्रशासनाचे काम मुख्याध्यापिका व शिक्षक बनून विद्यार्थिनींनी सांभाळले. यामध्ये थँक्स ए टीचर या उपक्रमानुसार एक मुख्याध्यापिका प्रशासक व शिक्षिका यांनी पूर्वनियोजित पाठाची तयारी करून शिकविण्याचे काम पूर्ण केले. यात सहभागी वैष्णवी वाडीभस्मे हिने मुख्याध्यापिकेची भूमिका वठविली. तसेच शिक्षिका म्हणून खुशी लाळे, आरती गायधने, दिव्या लाळे, कावेरी लसूनते, सानिया निंबार्ते आदींनी काम सांभाळले. या वेळी मुख्याध्यापिका बोरकर यांनी शिक्षक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक असून, विद्यार्थ्यांना शिस्त व सुसंस्कारित करून एक उत्तम नागरिक म्हणून घडविण्याचे काम शिक्षकांमुळे होते. एक आदर्श समाजापुढे शिक्षकांनी ठेवून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता तयार करून घडवावे, असे सांगितले. सूत्रसंचालन विलास कालेजवार, प्रास्ताविक गाईड शिक्षिका प्रेरणा कंगाले व आभार भीमराव मेश्राम यांनी मानले.