स्नेहल रामटेके अव्वल
By Admin | Published: May 28, 2015 12:32 AM2015-05-28T00:32:58+5:302015-05-28T00:32:58+5:30
भंडारा येथील नगर परिषद गांधी विद्यालयाचा विद्यार्थी स्रेहल राजेंद्र रामटेके हा विज्ञान शाखेतून जिल्ह्यातून पहिला आला
निकाल ९४.६८ टक्के
साकोली तालुका आघाडीवर; लाखांदूर पिछाडीवर
भंडारा : भंडारा येथील नगर परिषद गांधी विद्यालयाचा विद्यार्थी स्रेहल राजेंद्र रामटेके हा विज्ञान शाखेतून जिल्ह्यातून पहिला आला आहे. त्याला ९३.५९ टक्के (६०९) गुण मिळाले आहेत. भंडारा तालुक्यातील विनोद कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली येथील हितेंद्र रूपचंद पागोटे व भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची मृणाली हरिराम बोकडे हे दोघेही संयुक्तपणे जिल्ह्यातून द्वितीय आले आहेत. दोघांना ९२.६१ टक्के (६०२) गुण मिळाले आहेत
शाखानिहाय निकाल
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.२२ टक्के, कला शाखेचा निकाल ९१.०१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९४.१५ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ९४.०१ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे $$५,८४७ विद्यार्थी, कला शाखेचे ५,०५१ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ७५७ तर एमसीव्हीसी शाखेचे ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
साकोली आघाडीवर
भंडारा जिल्ह्याचा निकाल ९६.३१ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून साकोली तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात टक्केवारीमध्ये भंडारा ९४.१९, पवनी ९५.०४, लाखनी ९५.५९, तुमसर ९४.११, मोहाडी ९६.०२ तर लाखांदूर तालुक्याची टक्केवारी ९०.२३ इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.९२ असून मुलींची टक्केवारी ९६.३१ आहे.
तालुकानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
१२ हजार ६३ विद्यार्थी उर्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ३,७१६ परीक्षार्थ्यांपैकी ३,५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून ८७० पैकी ७८५ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून १,४२७ पैकी १,३६४ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून १,६०७ पैकी १,५४३ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून १,४७२ पैकी १,३९९ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून १,६११ पैकी १,५५४ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून २,०३८ पैकी १,९१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
१०० टक्के निकालाच्या २८ शाळा
यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत जिल्ह्यातील २८ शाळांनी निकालाच्या टक्केवारीत १०० गाठली आहे. यात भंडारा तालुक्यातून ४, लाखांदूर ३, लाखनी ८ तर मोहाडी २, साकोली ५ व तुमसर येथील ६ शाळांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
२८ शाळांचा निकाल १०० टक्के
भंडारा : जकातदार गर्ल्स ज्यु. कॉलेज, जेसीस कॉन्व्हेंट एन.जे. पटेल ज्यु. कॉलेज, स्व. निर्धनराव पाटील वाघाये ज्यु. कॉलेज माडगी टेकेपार. लाखांदूर : जिल्हा परिषद ज्यु. कॉलेज दिघोरी मोठी, जिल्हा परिषद कला महाविद्यालय सरांडी बुज., सुबोध विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मासळ. लाखनी : जिल्हा परिषद गांधी ज्यु. कॉलेज लाखनी, गोविंद ज्यु. कॉलेज पालांदूर चौ., जिल्हा परिषद ज्यु. कॉलेज पोहरा, ज्ञानेश्वर कला ज्यु. कॉलेज सालेभाटा, रावजी फटे ज्यु. कॉलेज खराशी, शुक्राचार्य ज्यु. कॉलेज मिरेगाव, स्व. निर्धनराव पाटील वाघाये ज्यु. कॉलेज रेंगोळा माडगी. मोहाडी : नवप्रभात उच्च माध्यमिक विद्यालय कांद्री (जांब), जिल्हा परिषद हायस्कूल वरठी. साकोली : नंदलाल पाटील कापगते ज्यु. कॉलेज साकोली, जिल्हा परिषद ज्यु. कॉलेज एकोडी किन्ही, कलाबाई कन्या ज्यु. कॉलेज साकोली, कामाई करंजेकर कन्या ज्यु. कॉलेज एकोडी (बाम्पेवाडा), जीईएस कला ज्यु. कॉलेज विरशी. तुमसर : नगर परिषद कस्तुरबा कन्या ज्यु. कॉलेज तुमसर, आदिवासी विद्यालय व उच्च माध्यमिक शाळा चिखली, स्व. एम. माटे कला कनिष्ठ महाविद्यालय खापा, सेंट जॉन मिशन ईग्लिश ज्यु. कॉलेज तुमसर, मातोश्री विज्ञात ज्यु. कॉलेज तुमसर व लॉर्ड लेडी ईग्लिश शाळा तुमसर.