संवादातील गोडव्यानेच सामाजिक विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:05 PM2019-01-25T23:05:17+5:302019-01-25T23:05:41+5:30
संवाद आणि संप्रेषण ही एक मोठी कला असून आजच्या काळात संवादात गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी सामाजिक विकासात संवाद ही महत्वपूर्ण भूमिका बजावित असते, असे विचार वीज वितरण कंपनीचे भंडारा येथील सहायक अभियंता स्वाती पराग फटे यांचे आहेत.
भंडारा : संवाद आणि संप्रेषण ही एक मोठी कला असून आजच्या काळात संवादात गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी सामाजिक विकासात संवाद ही महत्वपूर्ण भूमिका बजावित असते, असे विचार वीज वितरण कंपनीचे भंडारा येथील सहायक अभियंता स्वाती पराग फटे यांचे आहेत.
आजघडीला क्षुल्लक कारणावरूनही एकमेकांचा राग व द्वेष केला जातो. लहानशी बाबही सामाजिक, आर्थिक, धार्मिक व विकासाच्याबाबतीत मोठा अडथळा निर्माण करते. यासाठी आपण स्वत:हून संवाद साधायला सुरूवात केली तर बऱ्याचशा समस्या निकाली निघू शकतात. समोरचा व्यक्ती वाईट बोलत असेल तर आपणही का वाईट बोलावे, याचा विनम्रतेने विचार करणे आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्धांची शिकवण सर्वांनी आत्मसात करायला हवी. बोललेले अपशब्द परत आपल्यालाच लागू पडतात हा निसर्ग नियम कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे मानवाला मिळालेल्या संवाद कलेचा वापर सकारात्मक व्हायला हवा.