सामाजिक वनीकरणाच्या झाडांवर कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:41 PM2019-02-25T22:41:19+5:302019-02-25T22:42:03+5:30
तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या वन विभागाचे जागेत पाईप लाईनचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागच्या मौल्यवान वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेसीबीची कुऱ्हाड धावत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांची बघ्यांची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या वन विभागाचे जागेत पाईप लाईनचे खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामात वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागच्या मौल्यवान वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेसीबीची कुऱ्हाड धावत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांची बघ्यांची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.
तुमसरकरांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिहोरा परिसरातील वैनगंगा नदीवरील वांगी गावाचे शेजारी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या पाईपलाईनचे खोदकाम सिहोरा परिसरातील तुमसर-बपेरा राज्य मार्गाचे लगत करण्यात येत आहे. पाईपलाईनचे खोदकाम कंत्राट प्रीतीपालसिंग नामक कंपनीला देण्यात आले आहे. पाईप लाईन खोदकाम पूर्णत्वाकडे आले आहे. राज्य मार्गाचे लगत पाईप लाईनचे खोदकाम करताना अनेक मौल्यवान झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु कुणी चौकशी केली नाही. झाडांचे नुकसान करीत असताना कारवाई करिता पुढाकार घेण्यात आला नाही.
रनेरा गावाचे हद्दीत गट क्रमांक २६५ आणि ३२८ मध्ये वन विभागाचे राखीव क्षेत्र आहे. या राखीव गटात मौल्यवान वृक्ष आहे. याच गट क्रमांकमध्ये २०१७ पासून सामाजिक वनीकरण विभाग मार्फत मौल्यवान वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २ कि.मी. अंतर पर्यंत झाडांचे संवर्धन आणि संगोपन कार्यात १३ लाख ५७ हजार ५३९ रुपये खर्च करण्यात आले आहे. या झाडांची उंची ८ ते १० फुट पर्यंत झाली आहे. यामुळे वनविभागाचे राखीव गटात मौल्यवान वृक्ष असल्याने जेसीबीने खोदकामाची मंजुरी वन विभाग देत नाही. परंतु रनेरा गावाचे शिवारात नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. गट क्रमांक २६५ ते ३२८ मध्ये पाईप लाईनचे खोदकाम जेसीबी मशीनने करताना वन विभागाचे झाडांचे नुकसान झाले आहे. उभे असणाºया झाडांची मुळे (जडी) तोडण्यात आली आहे.
ही झाडे कधी उन्मळून कोसळतील याचा नेम नाही. या शिवाय पाईप लाईनचे खोदकामात सामाजिक वनीकरण अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या झाडांना बसला आहे. या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गटात जेसीबी मशीन झाडांचे नुकसान करीत असताना कार्यरत कर्मचाऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे. विभागाने घटनास्थळावर पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त झाडांचा पंचामा केला असला तरी जेसीबी मशीनचे खोदकाम थांबविण्यात आले नाही. सामाजिक वनीकरण विभागाने ७ झाडांचे नुकसान झाल्याचे कागदावरील पंचनाम्यात नोंद केली आहे. पंचनामा तयार करताना रक्षक आर.डी. चौधरी, सरपंच कोमल टेंभरे, टी.एस. भेग्रे उपस्थित होते. काही वन विभागाचे कर्मचारी होते. परंतु झाडांचे डोळ्यादेखत नुकसान होत असताना यंत्रणेचे कर्मचारी बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तशी पंचनाम्यात नोंद केली.
हाच निर्णय आणि नियम वन विभागांची यंत्रणा सामान्य जनतेसाठी लागू करणार नाही. एका योजनेसाठी वन विभागाने नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप आहे. वनविभागाचे राखीव गटात पाईप लाईन खुल्या पद्धतीने नेली जात आहे.
जमिनीत खोदकामाची मंजुरी वन विभाग देत नाही. परंतु रनेरा शिवारात सर्व काही आलबेल करण्यात आले आहेण नळ योजनेला कुणाचा विरोध नाही. परंतु नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. सामान्य जनतेसाठी वन विभागाचे नियम असल्याचे दिसून आले आहे. झाडांचे नुकसान भरपाई करिता तुमसर नगर पालिकेला पत्र देणार असल्याचे उपस्थित कर्मचाºयांनी सांगितले असले तरी वन विभागाने नाली खोदकाम संदर्भात भूमिका स्पष्ट केली नाही. या संदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी जोशी यांना संपर्क साधला असता होवू शकला नाही.