समाजकल्याण हा वंचितांचा विभाग

By Admin | Published: January 16, 2017 12:33 AM2017-01-16T00:33:29+5:302017-01-16T00:33:29+5:30

समाजाच्या वंचितांसाठी काम करणारे हे विभाग असून दलित शोषित व समाजाच्या शेवटच्या घटकांना हे विभाग शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देते.

Social Welfare Department | समाजकल्याण हा वंचितांचा विभाग

समाजकल्याण हा वंचितांचा विभाग

googlenewsNext

गायकवाड यांचे प्रतिपादन: देवसूदन धारगावे यांना भावपूर्ण निरोप
भंडारा : समाजाच्या वंचितांसाठी काम करणारे हे विभाग असून दलित शोषित व समाजाच्या शेवटच्या घटकांना हे विभाग शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देते. शासनाच्या योजना सोबतच अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य सुध्दा सामाजिक न्याय विभागाकडून केल्या जाते. धारगावे यांनी सामाजिक न्याय विभागाचे काम जिल्ह्यात सचोटीने केले. सामाजिक न्याय भवनात एमपीएससी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय तसेच स्पर्धा मार्गदर्शन केंद्र निर्माण करुन आपल्या कार्याची पावती दिली, असे प्रतिपादन जिल्हा जातपडताळणी समिती भंडाराचे उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी केले
सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण देवसूदन धारगावे यांच्या पदोन्नतीने बदली गोंदिया येथे झाल्याने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा जात पडताळणी समिती गोंदियाच्या उपायुक्त तथा सदस्य पदी नियुक्ती झाल्याने अभिनंदन तथा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गोंदिया मंगेश वानखेडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वाकोडे उपस्थित होते.
यावेळी देवसूदन धारगावे यांचा उपायुक्त पदी नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी बी.पी. पृथ्वीराज यांनी सामाजिक न्याय भवनात स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु केल्याबद्दल धारगावे यांचे अभिनंदन केले.
देवसूदन धारगावे यांनी आपल्या सत्कारपर भाषणात सांगितले की, या जिल्ह्यात काम करतांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. अपूऱ्या कर्मचारी वर्गासह काम करावे लागले. परंतु शासन दरबारी वारंवार मागणी करुन पदांची मागणी केली. तसेच सामाजिक न्याय भवन हे लोकांचे भवन आहे. त्यामुळे त्याची जातीने काळजी घेतली, वेळोवेळी अनेक कडक निर्णय सुध्दा घ्यावे लागले. या भवनाच्या सुशोभिकरणाच्या कामात विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सामाजिक न्याय भवनात वाचनालय व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केद्राची स्थापना करण्यात आली. याचे श्रेय तात्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना आहे, अशी त्यांनी कबुली दिली. मला या जिल्ह्यात जे सहकार्य मिळाले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सुधीर वाळके यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभाग हे समाजातील वंचितांसाठी कार्य करणाऱ्या संस्था असून त्याचा जवळचा संबंध आहे. समता स्वातंत्र, बंधुता व वंचितांना माहिती अभियान राबविण्यात आला. त्यावेळी त्यांनी सहकार्य पूर्वक भावना ठेवली. तसेच जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यास मदत झाली. तसेच धारगावे यांनी सामाजिक न्याय भवनात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरु करुन जिल्हयात एक मानाचा तूरा रोवला आहे. समाजासाठी काही नवीन करुन दाखविले पाहिजे हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. सामाजासाठी नेहमी कार्यरत असणारा एक उत्कृष्ट अधिकारी असा उल्लेख त्यांनी केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रास्ताविक वाकोडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद गणविर यांनी केले. तर आभार समाज कल्याण निरिक्षक आवतकर यांनी मानले. या कार्यक्रमास सर्व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Social Welfare Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.