दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:04 PM2018-12-26T22:04:05+5:302018-12-26T22:04:25+5:30

समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.

Social workers should change the direction of direction | दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे

दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : ठाणा पेट्रोलपंप येथे तेली समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे समाज मजबूत होतो. यासाठी आईने केलेल्या कार्याची चिंतन- मनन करुन तिचे ऋण फोडण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
श्री संत जगनाडे महाराज तेली समाज संघटना ठाणा पेट्रोलपंपद्वारे मधुबन सभागृहात तेली समाजबांधव मेळावा, आध्यात्मिक प्रवचन, उपवधु-वर परिचय व समाज प्रबोधन व समाज प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे होते. यावेळी माजी आमदार आनंदराव वंजारी, जिल्हा परिषद नागपूरचे अध्यक्ष निशा सावरकर, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास लांजेवार, विदर्भ तेली समाज संघटना अध्यक्ष धनंजय देविदास लांजेवार, विदर्भ तेली समाज संघटना अध्यक्ष धनंजय खोब्रागडे, राजेश पिसे, राजहंस वाडीभस्मे, सुभाष वाडीभस्मे, चंद्रेशखर गिरडे, माजी सरपंच कल्पना निमकर, पोलीस पाटील अशोक बालपांडे, तारांचद हटवार, निता आकरे, श्रीहरी जौंजाळ, प्रेमलाल लांजेवार, अभिजित वंजारी, गोरखनाथ किरपाण उपस्थित होते.
बंडुभाऊ सावरबांधे म्हणाले, समाजातील दिशाहिन बांधवांना संघटनेद्वारे दिशा दाखवून आर्थिक, सामाजिक व बौध्दीक विचाराचे बाळकडू देवून भरिव विकास साधावे तरच समाजाची प्रगती शक्य होईल.
तत्पूर्वी सकाळी दत्त मंदिर ठाणा पेट्रोलपंप येथून संताजी जगनाडे महाराज यांची तैलचित्र, ग्रंथाची पालखी काढण्यात आली. संताजीच्या जय जयकाराने ठाणा नगरी दुमदुमली. राष्टÑीय महामार्ग गांधी वार्ड, जुना ठाणा हनुमान वार्ड मार्गे मधुबन सभागृह येथे पालखी यात्राचे विसर्जन करण्यात आले. तद्नंतर उपवर-वधु परिचय मेळावा घेण्यात आला. दिवंगत रमेश चोपकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धा परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. संचालन व आभार संघटना सचिव इंद्रजीत कुर्झेकर यांनी केले.
मेळाव्यासाठी प्रशांत बालपांडे, महेश पडोळे, पुरुषोत्तम कांबळे, कंठीराम दंडारे, किशोर दंडारे, भास्कर वाडीभस्मे, सुरेश बावनकुळे, सुभाष मलेवार, संजय पडोळे, रविंद्र बावनकुळे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Social workers should change the direction of direction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.