सेवाभावनेतूनच समाजविश्वास शक्य
By admin | Published: January 1, 2015 10:57 PM2015-01-01T22:57:19+5:302015-01-01T22:57:19+5:30
आधुनिक विज्ञान युगात भरकटलेल्या युवकांना चांगल्या गुणांचे सुसंस्कारीत विचार रूजविले जावे. जेणे करून त्यांच्यात सेवाभाव निर्माण होवून गावांतील समाजविकासाची कामे शक्य होईल,
रासेयो शिबिराच्या समारोप : प्राचार्य मोहबंशी यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : आधुनिक विज्ञान युगात भरकटलेल्या युवकांना चांगल्या गुणांचे सुसंस्कारीत विचार रूजविले जावे. जेणे करून त्यांच्यात सेवाभाव निर्माण होवून गावांतील समाजविकासाची कामे शक्य होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंंशी यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपपंप जवाहरनगर द्वारे पिपरी पुनरवसन येथे आयोजित रासेयो शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिथी म्हणून गोविंददादा कातोरे, माजी सरपंच भगवान ढेंगे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कातोरे, पोलीस पाटील दिगंबर ठवकर, रमेश ठवकर, प्रा. जे.व्ही. कोटांगले, प्रा. अनिता वंजारी, प्रा. पौर्णिमा रहांगडाले, प्रा. एम.ए. रहांगडाले उपस्थित होते.
यावेळी कातोरे म्हणाले, जीवनात प्रत्येकाने स्वत:साठीच जीवन न जगता समाजातील गरजु लोकांकरीता जगावे ज्यांना गरज असेल अशा लोकांना नेहमी मदत करावी. याप्रसंगी सात दिवसीय शिबिरात ग्राम पिपरी व मारेगाव येथील स्वच्छ भारत अभियान संकल्पने अंतर्गत रस्ते, बोरवेल, नाल्या स्वच्छ करण्यात आले. त्याचप्रमाणे पथनाट्य, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोकाभिमुख कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली. उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.ए. रहांगडाले यांनी केले. संचालन प्रा. सुभाष गोंडाणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. साधना वाघाडे यांनी केले. (वार्ताहर)