समाजसाठी पार्टी सोडकेन आव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:18 PM2017-12-09T23:18:44+5:302017-12-09T23:19:46+5:30

ना तोरोसाठी, ना मोरोसाठी फक्त आपलो समाजसाठी सगळाजण पार्टी (पक्ष) सोडकुन्या एकत्र आबन. सगळाजण एक होयकुन्या समाज की लढाई लढबन असे आवाहन करीत आदिवासी हलबा समाजाचा निघालेल्या मोर्चानंतर नेतृत्व करणाºयांनी समाजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले.

For the society, leave the party | समाजसाठी पार्टी सोडकेन आव

समाजसाठी पार्टी सोडकेन आव

Next
ठळक मुद्देहलबा समाजाचा हल्लाबोल मोर्चा : न्यायासाठी एकसंघ होण्याची केली घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ना तोरोसाठी, ना मोरोसाठी फक्त आपलो समाजसाठी सगळाजण पार्टी (पक्ष) सोडकुन्या एकत्र आबन. सगळाजण एक होयकुन्या समाज की लढाई लढबन असे आवाहन करीत आदिवासी हलबा समाजाचा निघालेल्या मोर्चानंतर नेतृत्व करणाºयांनी समाजाला एकसंघ होण्याचे आवाहन केले.
हलबा समाजाचा मोर्चा शनिवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी समाज बांधवांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. समाजासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा व एकसंघ होऊन समाजाची लढाई लढा, असा संदेश दिला.
शहरातील चांदणी चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय दलाल, डॉ.अनिल धकाते, आदिम कृती समितीचे आशिष पात्रे, नगरसेवक नितीन धकाते, आदिम कृती समितीचे मनोहर हेडाऊ, हलबा महासंघाचे दुर्वास धार्मिक, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, मोहाडीच्या नगराध्यक्ष स्वाती निमजे, राजू हेडाऊ, खुशाल निमजे, यशवंत सोनकुसरे, बंडू बारापात्रे आदींनी केले.
राज्य शासनाने स्वत:च्या विशेषाधिकाराचा वापर करून हलबा समाज बांधवांवर कारवाई करू नये, जात प्रमाणपत्र अवैध झाल्यामुळे संपुष्टात आणण्यात आली आहे. हलबा, हलबी जमातीचे प्रमाणपत्र देताना १९५० च्या आधीचे पुरावे मागण्याचे आग्रह करू नये असे आदेश काढावे, समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, अनुसूचित जमाती पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेले हलबा-हलबी जमात पडताळणी प्रकरण शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत काढू नये, सर्व समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा, आदी मागण्यांना घेवून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोर्चेकरांनी कोष्टी भाषेतच भाषण करून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी नितीन धकाते, धनंजय दलाल, दुर्वास धार्मिक, स्वाती निमजे, जया सोनकुसरे, डॉ. अनिल धकाते आदी समाज बांधवांनी मोर्चेकरांना संबोधीत केले. यावेळी त्यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून समाजासाठी एक होण्याचे आवाहन केले. या मोर्चाला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी पाठिंबा दर्शवित ते हलबा समाजाच्या आजच्या मोर्चात सहभागी झाले होते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता
घोषणांनी दणाणले शहर
या मोर्चात हलबा एकता जिंदाबाद, कोष्टी आमरो धंदा आहा, जात आमरी हलबा आहा, उठ हलबा जागा हो, संघटनेचा धागा हो, अशो कशो देत नाही, लेयो शिवाय रहणार नाही, हलबा जाती जमातीला जात प्रमाणपत्र मिळालेच पाहिजेत, जात तपासणी समिती बरखास्त करा, आरक्षण आमच्या हक्काचे आदींसह सरकारविरोधी घोषणा मोर्चेकरांनी दिल्या.
राजकारण करणाऱ्याला धडा शिकवा
या समाज बांधवांनी आवेशपूर्ण कोष्टी भाषेतून भाषण केली. यात त्यांनी, आमरो समाज को फायदा लेयकुण्या कुणी आपलो राजकारण करत रह तर, आणि आमरो प्रश्न सरकार को समोर मांडत नही रह तर, असो नेताला आम्ही भर चौकमा पकडून पेट्रोल टाकून्या पेटबन टाकू. अशी धमकी या मोर्चात काही समाज बांधवांनी दिला.
आमदारांना इशारा
निवडणुका आल्या की राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागतात. त्यानंतर मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला. आता आमदारांनी हिवाळी अधिवेशनात हलबा समाजाचा मुद्दा सभागृहात मांडून न्याय न दिल्यास २०१९ च्या निवडणुकीत यांना माजी आमदार करण्याची शपथ मोर्चेकºयांनी घेतली.

Web Title: For the society, leave the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.