मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर पुन्हा मातीकाम
By admin | Published: April 10, 2017 12:31 AM2017-04-10T00:31:30+5:302017-04-10T00:31:30+5:30
तालुक्यातील ग्रा. पं. धुटेरा येथे रोहयो अंतर्गत गावातील आखरापासून ते देवसराळ महादेव मंदिरापर्यंतचा रस्त्याचे
घुटेरा येथील प्रकार : मोजमाप न करता शेतावर केले अतिक्रमण
तुमसर : तालुक्यातील ग्रा. पं. धुटेरा येथे रोहयो अंतर्गत गावातील आखरापासून ते देवसराळ महादेव मंदिरापर्यंतचा रस्त्याचे दोन मुरुमीकरण झालेल्या रस्त्यावर मातीकाम करुन रस्ता खराब करण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे अपघात होण्याची सत्र सुरु आहे.
रोहयो अंतर्गत अशा रस्त्याचे नियोजन व काम केले जाते की, जिथे योग्य रस्ता नाही व तिथे मातीकाम व मुरुमीकरण करुन नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा व्हायला पाहिजे. मात्र धुटेरा ग्रा. पं. चे जरा वेगळेच म्हणावे लागेल. त्याच गावातील रहिवासी हा तांत्रिक पॅनल अधिकारी असल्याने ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांशी संगनमत करुन मुरुमकाम झालेल्या रस्त्यावर मातीकाम करणे सुरु केले आहे. चांगल्या रस्त्यावर मातीकाम होत असेल पावसाळ्यात तो रस्ता चिखलमय होवून नागरिकांना ये-जा करण्यास त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या रस्त्याचे मातीकाम करवून घेत असतांना तांत्रिक पॅनल अधिकाऱ्याने आपल्या शेताचे खोलीकरण करुन मजुरांच्या हातानेच शेतातील धुरे बनविले व शेतात जाण्याकरिता रस्ताही बनविला. ईतकेच नव्हे तर या महाशयांनी ईतराच्या शेतात मोठमोठे खड्डे खोदवून घेतले. त्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साचून प्राणहाणीही होण्याची शक्यता आहे.
सदर कामावर रोजगार सेवक नसतांना रोहयोची कामे सुरु करण्यात आली. परिणामी रस्त्याचे मोजमाप नाही. आपल्याच मर्जीने रस्त्याची रुंदी व उंची वाढविण्यात आली. त्यामुळे ईतराची शेतजमीन त्या रस्त्यात दाबल्या गेल्याने शेतकऱ्यांना शेतजमिनीला मुकावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबतची लेखी तक्रार तेथील रहिवासी देविप्रसाद चुनाराम बेलखेडे यांनी खंडविकास अधिकाऱ्यासह वरिष्ठांनाही दिली. मात्र अधिकाऱ्यांनी थातुरमातुर चौकशी करुन दोषींना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र इथे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसते. जोपर्यंत या रस्त्यावर एखादया आपल्या प्राणाला मुकावे लागेल तेव्हाच प्रशासन कारवाई करणार का असा सवाल बेलखंडे यांनी तक्रारीत केला आहे. (शहर प्रतिनिधी)