साकोली-तुमसर विधानसभा क्षेत्रात आघाडीची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 11:16 PM2018-06-01T23:16:30+5:302018-06-01T23:16:49+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४८ हजार ९७ मताधिक्क्यांनी निवडून आले. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्याती एकूण ६ विधानसभा क्षेत्रातून साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातून कुकडे यांना मताधिक्य चांगले मिळाले आहे.

Sokoli-Tumsar assembly constituency is one of the leading alliances | साकोली-तुमसर विधानसभा क्षेत्रात आघाडीची सरशी

साकोली-तुमसर विधानसभा क्षेत्रात आघाडीची सरशी

Next
ठळक मुद्देभंडारा-गोंदिया पिछाडीवर : लोकसभा पोटनिवडणूक

इंद्रपाल कटकवार/देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४८ हजार ९७ मताधिक्क्यांनी निवडून आले. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्याती एकूण ६ विधानसभा क्षेत्रातून साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातून कुकडे यांना मताधिक्य चांगले मिळाले आहे. तर दुसरीकडे भंडारा व गोंदियामध्ये काही प्रमाणात मतामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून आले.
काँग्रेस-राकाँ-रिपा व पिरीपा आघाडीचे उमेदवार असलेल्या मधुकर कुकडे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांना पराभूत केले. लोकसभा क्षेत्र असलेल्या सहा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन क्षेत्रातून म्हणजेच साकोली व तुमसर येथून कुकडे यांनी लीड मतांचे अंतर कायम ठेवण्यात यश प्राप्त केले. पहिला राऊंडपासूनच कुकडे हे पटले यांच्यावर आघाडीने होते. सदर विधानसभा क्षेत्रात कुकडे यांची लोकप्रियता अभेद्य असल्याचे दिसून आले.
भंडारा व गोंदिया हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. मात्र येथे राकाँला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागले. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात भाजपने चांगले मत घेतली. भंडारा विधानसभा क्षेत्रात हेमंत पटले यांनी ३,८०४ मतांनी कुकडे यांना मागे टाकले. दुसरीकडे गोंदिया विधानसभा क्षेत्रात २,३१४ मतांनी आघाडी घेतली तरी लीड मतांच्या अंतराला ते पार करू शकले नाही.
गृहक्षेत्रात दबदबा कायम
तुमसर विधानसभा क्षेत्र हे मधुकर कुकडे यांचे गृहक्षेत्र आहे. यात त्यांना चांगली मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. हा अंदाज खराही ठरला. त्यांनी एकूण मतदानापेक्षा निम्यापेक्षा जास्त मते प्राप्त केली. तुमसर विधानसभा क्षेत्रात त्यांनी ८६,३१६ मते प्राप्त केली. या क्षेत्रात १ लक्ष ६७ हजार २४५ मतदान झाले. भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्यापेक्षा या विधानसभा क्षेत्रातून १८,८२२ मते अधिक घेतले. कुकडे यांनी गृहक्षेत्रात दबदबा कायम ठेवला, अशी चर्चा होऊ लागली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातही कुकडे यांनी १५,१७४ मते जास्त प्राप्त केली. या विधानसभा क्षेत्रात १ लक्ष ८६ हजार ५९४ मतदारांनी मतदान केले होते. एकूण मतदानाच्या ४७.५३ टक्के मतदान तालुका विधानसभा क्षेत्रात कुकडे यांना मिळाले. तिरोडा विधानसभा क्षेत्रात कुकडे यांना ७,९२८ मते मिळाली तर अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रात कुकडे यांनी १२,२८७ मतांची आघाडी घेतली होती. सदर निवडणुकीत उमेदवार म्हणून मिळालेली मते अशी आहेत. यात मधुकर यशवंत कुकडे (राकाँ) ४,४२,२१३, हेमंतकुमार श्रावण पटले (भाजप) ३,९४,११६, अक्षय योगेश पांडे विदर्भ माझा पार्टी ४३१२, गोपाल टिकाराम उईके २४७६, डॉ. चंद्रमणी कांबळे १७५८, जितेंद्र आडकू राऊत १९९१, धर्मराज रामचंद्र भलावी १७१५, नंदलाल काटगाये ११५४, बोरकर राजेश पुरुषोत्तम ६३६२, मडावी लटारु कवडू ४०,३२६, अजबलाल शास्त्री ७४५३, किशोर पंचभाई १९६३, काशिराम गजबे ८२०४, चनिराम मेश्राम १६४४, पुरुषोत्तम कावळे २७११, राकेश टेंभरे ६८९३, रामविलास शोबेलाल मस्करे ९४५४ तर सुहास अनिल फुंडे यांन ८१०३ मते प्राप्त केली.

Web Title: Sokoli-Tumsar assembly constituency is one of the leading alliances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.