अड्याळ-लाखनी महामार्गावरील सोलर पथदिवे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:29+5:302021-05-28T04:26:29+5:30
अड्याळ लाखनी महामार्गाचे जेव्हा बांधकाम झाले त्यामुळे ग्रामस्थांना तथा वाहनचालकांना एक मोठा व्यवस्थित रोड तर मिळाला, पण यामुळे ...
अड्याळ लाखनी महामार्गाचे जेव्हा बांधकाम झाले त्यामुळे ग्रामस्थांना तथा वाहनचालकांना एक मोठा व्यवस्थित रोड तर मिळाला, पण यामुळे त्रासही तितक्याच प्रमाणात झाला. फक्त एक महिन्याच्या कालावधीत रस्त्यावर पडणारा प्रकाश पडणेसुद्धा बंद झाला आहे. मग लावलेले सोलर पॅनल यांचा दर्जा निकृष्ट की दर्जेदार हाही एक प्रश्न आहे. शिवाय कंपनीमार्फत झालेल्या कामानंतर फक्त एक महिन्यात लावलेल्या सोलर पॅनलची ही दुर्दैवी दुर्दशा झाली तर मग केलेली कामे कशी केली असणार याचा तरी संबंधित विभाग विचार करतोय का ? असा सवाल उपस्थित होत आहे. एक-दोन महिन्यांतच पसरणारा अंधार, रस्त्यालाही तडे गेले आणि बांधलेल्या नालीवरही आच्छादन नाही, असे बिकट प्रश्न असल्याचे निदर्शनास येते आहे. याचप्रमाणे याच मार्गावर असणाऱ्या तिर्री गावातसुद्धा यापेक्षा बिकट परिस्थिती असल्याचे तेथील सरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी सांगितले.
दहा वर्षांपर्यंत आम्हाला येथील मेंटेनन्स करायचा आहे. गेलेले सोलर पॅनल हे लॉकडाऊन संपल्यानंतर मजूर व सामान मिळताच तत्काळ लावून देण्यात येतील.
अतुल डोरलीकर, सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर.