समाधान शिबिर विकासाचे माध्यम
By admin | Published: January 30, 2016 12:59 AM2016-01-30T00:59:17+5:302016-01-30T00:59:17+5:30
शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात, त्यातून सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शासनाच्या महसूल विभागांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे ...
धनादेश वितरण : विजयकुमार उरकुडे यांचे प्रतिपादन
करडी (पालोरा) : .शासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात, त्यातून सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शासनाच्या महसूल विभागांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे त्यातून जनतेच्या समस्यांचे निराकरण होवून विकासाला नवी चालना मिळत आहेत. नागरिकांनी या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजयकुमार उरकुडे यांनी देव्हाडा येथे संपन्न झालेल्या शिबिरात व्यक्त केले.
राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत राजस्व अभियानातून समाधान शिबिराचे आयोजन देव्हाडी बुज येथील साईबाबा मंदिराचे आवारात करण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाधिकारी उरकुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य महादेव पचघरे यांनी केले. यावेळी सरपंच विणा पुराम, उपसरपंच महादेव फुसे, माजी जि.प. सदस्य महेंद्र शेंडे, डॉ. अडकने, सरपंच किशोर माटे, दिनदयाल बोंदरे, यशवंत आसटकर, यमु बोंदरे, सुजिता वासनिक, अरुण शेंडे, रेखा धुर्वे, मंदा लाळे, दुर्याेधन बोंदरे, तहसिलदार पोहनकर, नायब तहसिलदार थोटे, उपजिल्हाधिकारी शहारे आदी उपस्थित होते.
पचघरे यावेळी म्हणाले, समाधान शिबिराचे आयोजन गावागावात झाले पाहिजे. त्या प्रमाणात शिबिराचे आयोजन होत नाही. ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केला. जनतेच्या समस्याचे समाधान करताना कुठलाही भेदभाव करण्यात येवू नये. तालुक्यात गरजू लोकांना क्षावणबाळ, संजय गांधी योजना आदींच्या लाभासाठी पिळवणूक होत आहे.
आभार मंडळ अधिकारी पठान यांनी मानले. शिबिराला तालुका कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, विद्युत विभाग, बालविकास प्रकल्प विभाग, महसूल विभागाने स्टॉल लावून लोकांना समाधान शिबिराचे महत्व पटवून सांगितले. अतिथींच्या हस्ते अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. राशन कार्डाचे वाटप व फेरफार निकाली काढण्यात आले. शिबिरासाठी तलाठी बिरनवार, मौदेकर, कांबळे, घोडेस्वार, कोतवाल अनिल वैद्य, अशोक डोंगरे, भारत रोडगे, मेघराज वासनिक यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)