सौर कृषिपंपांमुळे वीज बिलातून मुक्ती
By admin | Published: December 22, 2015 12:44 AM2015-12-22T00:44:10+5:302015-12-22T00:44:10+5:30
ऊर्जेचा स्त्रोत नसणाऱ्या किंवा वन कायद्यासह इतर अडचणींमुळे वीज जोडणीपासून वंचित राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे.
भंडारा: ऊर्जेचा स्त्रोत नसणाऱ्या किंवा वन कायद्यासह इतर अडचणींमुळे वीज जोडणीपासून वंचित राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे वीज बिलातून शेतकऱ्यांची मुक्ती होणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रस्ताव मागविले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी, या उद्देशातून केंद्र शासनाने ही सौर कृषी पंप योजना सुरू केली. या योजनेत भंडारा जिल्ह्याचा समावेश केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले. या समितीने आपले कामही सुरू केले आहे.
नियमीत विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर, पयार्याने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पद्धतीच्या वीज निमितीर्मुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवमानावर विपरित परिणाम होत आहे.
यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्ती ठराविक प्रमाणात आहे. पर्यावरणास पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे आवश्यक आहे. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर स्वरूपाचा तसेच महत्वाचा आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले. त्यातूनच सौर कृषी पंप योजना पुढे आली. या योजनेला २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मंजूरी मिळाली होती. या योजनेत भंडारा जिल्ह्याचा समावेश केल्यानंतर ही योजना कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्याला १९५ सौरपंप देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महातिरणचे अधीक्षक अभियंता सदस्य सचिव आहेत. अन्य सदस्यांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतील वरिष्ठ भूवैज्ञानिक तसेच महाउर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एकंदर कृषीपंपांना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत राहावे लागणार नाही. वीज चोरी, वेळी-अवेळी खंडीत होणाऱ्या वीज पुरवठापासून शेतकरी मुक्त होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)