आंदोलनकर्त्यांना दिलासा
By admin | Published: March 5, 2017 12:31 AM2017-03-05T00:31:32+5:302017-03-05T00:31:32+5:30
सोळा तास भारनियमनाच्या विरोधात उपोषणावर बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला.
साकोली : सोळा तास भारनियमनाच्या विरोधात उपोषणावर बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला. आता आठ तासाऐवजी सोळा तास वीज मिळणार आहे. असे आ.बाळा काशीवार यांनी उपोषण मंडपात येऊन सांगितले व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आ.काशीवार यांनी उपोषणकर्त्यांना शरबत पाजून उपोषण सोडविले.
मागील आठवड्याभरापासून वीज वितरण कंपनी कार्यालय साकोली येथे भारनियमनाच्या विरोधाला शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेत आ.काशीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृषीपंपापाला १६ तास वीज पुरवठा करण्याची विनंती केली. यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. येत्या दोन दिवसातच १६ तास वीज पुरवठा सुरु होणार आहे. उपोषण सुटल्यानंतर आंदोलन मंडपातच उपस्थित शेतकऱ्यांची आ.काशीवार यांचे आभार मानले व शेतकऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, जि.प. सदस्य अशोक कापगते, खोटेले, बोरकर यांच्यासह तालुक्यातील महिला- पुरुष, शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आ.काशीवार यांचे स्वागत
आ.बाळा काशीवार यांनी कृषीपंपाचे भारनियमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल नगरपरिषद साकोली समोर आ.काशीवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, नितीन खेडीकर, सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, नगरसेवक रवी परशुरामकर, अनिता पोगडे, सुभाष बागडे, नालंदा टेंभुर्णे, भोजराज गहाणे यांच्यासह नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.