प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:02 AM2018-07-13T01:02:03+5:302018-07-13T01:02:17+5:30

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात या मागणीबाबत गुरूवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्याशी चर्चा केली.

Solve Primary Teacher Problems | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

Next
ठळक मुद्देसीईओंना निवेदन : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात या मागणीबाबत गुरूवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्याशी चर्चा केली. यात शिक्षकांच्या समस्यांचे समाधान न झाल्याने त्यांना न्याय द्यावा,अशी भावना व्यक्त झाली.
जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांच्याशी भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. यात २७ मार्च २०१८ ला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कोल्हे यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाला शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु शिक्षकांच्या समस्यांवर कुठलाही तोडगा न निघाल्याने अन्याय होत आहे.
मागण्यांमध्ये, विस्तापित शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक व केंद्र प्रमुखांच्या जागा त्वरीत भरावे व जागा रिक्त करू द्यावे, प्राथमिक शिक्षकांना जीपीएफची रक्कम असलेली नोंदवही द्यावी, डीसीपीएस धारकांची रक्कम हिशोब लावून खात्यावर जमा करावी, विज्ञान शिक्षक म्हणून १२ वी विज्ञान शाखेतील शिक्षकांना पदस्थापना द्यावी, प्राथमिक शिक्षकांना जि.प. हायस्कूलला रिक्त जागांवर शैक्षणिक पात्रतेनुसार व विकल्पानुसार पदस्थापना देण्यात यावी, प्राथमिक शिक्षकांमधून रिक्त जागांवर केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती द्यावी, वरिष्ठ, निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजन करणे व पात्र शिक्षकांचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ११७ शिक्षकांची स्टाफ पोर्टलमध्ये 'करंट ज्वॉईनिंग मॅनेजमेंट' तारीख नोंदविण्यात येण्यासाठी एनआयसीला पत्रव्यवहार करण्यात यावा, तसेच त्यांचे मे व जून २०१७ चे थकीत वेतन देण्यात यावे, शाळेचे विद्युत देयक स्थानिक स्वराज्य संस्थांनी भरावे, शालेय पोषण आहार योजनेचे एप्रिल २०१७ ते नोव्हेंबर २०१७ चे आॅफलाईन कागदपत्रे प्रदान करावी, वेतन तफावतीची प्रकरण निकाली काढावे, पंचायत समिती मोहाडी येथील जीपीएफमधील घोळ दुरूस्त करून पावती देण्यात यावी, विभागीय आयुक्त नागपूर यांच्या आदेशानुसार २००६ ते २०१८ पर्यंतच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ व थकबाकी देण्यात यावी, पदवीधर, पदोन्नती झालेल्या शिक्षकांना वेतन निश्चिती करताना विकल्पाचा लाभ देण्यात यावा, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगानुसार नक्षलग्रस्त भत्त्याची थकबाकीकरीता निधी उपलब्ध करून द्यावा, प्राथमिक शिक्षक वाय.एन. देशमुख, आर.एन. माटे, बी.बी. मेश्राम, डी.पी. कळंबे, ए.जे. एरने, आर.पी. शिवणकर यांची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक निकाली काढण्यात यावी, बिंदू नामावलीनुसार शिक्षकांची यादी प्रसिद्ध करणे, प्रसिद्ध झालेल्या जिल्हा सेवाजेष्ठता यादीतील चुका दुरूस्त करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, कोषाध्यक्ष विजय चाचेरे, संयुक्त चिटणीस केशव अतकरी यांच्यासह शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, जि.प. व पं.स. कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, जिल्हा संघटक सुरेश कोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Solve Primary Teacher Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक