दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवा
By Admin | Published: July 13, 2017 12:28 AM2017-07-13T00:28:13+5:302017-07-13T00:28:13+5:30
दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रहार क्रांती आंदोलनची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोपविले.
ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत मधील तीन टक्के निधी वाटप करण्यात यावे, अंतोदयमध्ये दिव्यागंचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, भंडारा जिल्ह्यातील अपंगांचा तीन टक्के जागेचा बॅकलॉग पूर्णपणे भरण्यात यावे, पोष्टमन भरतीमध्ये एक हजार ७०० जागा भरावयाचे असून एकही जागा अपंगासाठी राखीव नाही.
एससी, एसटी आणि महिलांना शुल्क नव्हती मात्र अपंगांना ओबीसी, ओपन प्रवर्गाइतकी शुल्क घेण्यात आली, तीन टक्के दुकान गाळे अपंगांसाठी राखीव ठेवण्यात यावे, घरकुलची यादी ड मध्ये अपंगांचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, आॅनलाईन युनिक आयडी कार्ड सामान्य रुग्णालय भंडारा येथे सुरू करण्यात यावे, एसटी बसची आॅनलाईन पास दिव्यांगांना जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागामार्फत देण्यात यावी, सर्व प्रकारच्या अपंगांना मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ६०० रूपयाहून दोन हजार रूपये करण्यात यावे, घर करामध्ये ७५ टक्के सुट देण्यात यावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रविभाऊ मने, सचिव योगेश्वर घाटबांधे, तालुकाध्यक्ष रंजन तिरपुडे, सुनिल कहालकर, चरणदास सोनवाने, एकनाथ बाभरे, वासूदेव कोडवते, मोहन हटवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.