कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:55 AM2019-06-08T00:55:54+5:302019-06-08T00:57:00+5:30

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासीत व मान्य मागण्याची पुर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील विज्युक्टाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Solve problems with junior college teachers | कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवा

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवा

Next
ठळक मुद्देविज्युक्टाची मागणी : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासीत व मान्य मागण्याची पुर्तता व अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी येथील विज्युक्टाचे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त असुनही अंशत: अनुदानित व विना अनुदानीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे त्यांचेवर झालेला अन्याय त्वरीत दूर करण्यात यावा, १ नाव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी, मुल्यांकन पात्र उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित अनुदान सुत्र त्वरित लागू करावी, इतर कर्मचाºयाप्रमाणे १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागु करावी, राज्याचा अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समकक्ष करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे, प्रा. अशोक गायधनी, प्रा. चंदन मोटघरे, प्रा. सोमेश्वर धांडे, प्रा. रुपलाल पटले, प्रा. भास्कर गिºहेपुंजे, प्रा. टेकराम भैसारे आदींचा समावेश होता.

Web Title: Solve problems with junior college teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.