वाचनालयाच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:52 PM2017-11-04T23:52:06+5:302017-11-04T23:52:24+5:30
सार्वजनिक वाचनालय समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाºयांची वेतनवाढ करावी,....
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : सार्वजनिक वाचनालय समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाºयांची वेतनवाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने आमदार डॉ.परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सार्वजनिक वाचनालय हे वाचन संस्कृती जपण्याचे महत्वाचे माध्यम आहे. परंतु वाचनालयाच्या अनेक वर्षांपासून या समस्येवर सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने शुक्रवारला आमदार डॉ. परिणय फुके यांची भेट घेऊन वाचनालय समस्या आणि कर्मचारी वेतनवाढ या समस्येबाबद निवेदन दिले. सार्वजनिक वाचनालयाचा प्रश्न हा ज्वलंत असून कर्मचारी अत्यल्प वेतनावर अनेक वर्षांपासून काम करीत आहे. यावेळी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अजिंक्य भांडारकर, राज्य कर्मचारी संघाचे कार्यवाह नंदू बनसोड, माधुरी टेंभेकर, विजया सुटे, प्रभू दामले, पुरणानंद भेलावे, विनय लाखे आदी वाचनालय कर्मचारी उपस्थित होते.
वाचनालय ही समाजाची संस्कृती केंद्र आहेत. यातून समाज परिवर्तन होण्यास मदत होते. वाचनालय कर्मचारी प्रश्न हा अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. यावर्षी कर्मचाºयांना न्याय देण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला पत्र व्यवहारात करून प्रश्न मार्गी लावणार आहे.
डॉ. परिणय फुके, आमदार,
भंडारा-गोंदिया विधानपरिषद.