आम्हाला कोणी कोरोनाची लस देता लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:11+5:302021-05-09T04:37:11+5:30
बॉक्स आरोग्य अधिकारी, कर्मचारी म्हणतात तुम्ही फ्रंटलाइन वर्कर नाहीत लाखांदूर आरोग्य केंद्रात कृषी कर्मचारी कोरोना लस घेण्यासाठी गेले होते. ...
बॉक्स
आरोग्य अधिकारी, कर्मचारी म्हणतात तुम्ही फ्रंटलाइन वर्कर नाहीत
लाखांदूर आरोग्य केंद्रात कृषी कर्मचारी कोरोना लस घेण्यासाठी गेले होते. मात्र, येथील लाखांदुरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कृषी कर्मचारी लसीकरणासाठी गेल्यावर आरोग्य केंद्रातील ऑपरेटर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी हे कृषी कर्मचाऱ्यांना तुम्ही फ्रंटलाइन वर्कर नाहीत, असे म्हणत त्यांना चक्क केबिन बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कृषी कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यासाठी काढलेल्या पत्रालाही काही आरोग्य केंद्रात केराची टोपली दाखवली जात आहे. लाखांदूर आरोग्य तालुका प्रशासनाकडून खऱ्या अर्थाने कृषी कर्मचाऱ्यांना दुय्यमपणाची वागणूक दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारपूस करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी दिलासा देण्याऐवजी चक्क केबिनबाहेर काढल्याचा अनुभव लाखांदुरातील कृषी कर्मचाऱ्यांना आला. ही गंभीर बाब असून याकडे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी कृषी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
कोट
लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करीत आहे. मात्र, यासाठी अनेक अडचणी येत आहेत. भंडारा शहरात एकही आशा वर्कर अथवा नर्स, आरोग्य कर्मचारी माहिती देण्यासाठी येत नाहीत. गेल्या वर्षभरात ते एकदाही फिरकलेच नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यावर कोणतेच नियंत्रण दिसत नाही.
सागर मेश्राम, राजगोपालाचारी वाॅर्ड, भंडारा.
कोट
मी आजही लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलो, पण तेथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लस नसल्याचे सांगत आहेत. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता नीट उत्तरे दिली जात नाहीत. लोकप्रतिनिधींचेही लक्ष नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगावे की, मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिनेश वासनिक, सामाजिक कार्यकर्ता केसलवाडा.
कोट
मी दोनदा जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणासाठी गेलो. मात्र, तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव दिसून आला. गर्दी असूनही तेथे पोलीस अथवा कोणी चौकीदार नाहीत. कोणीही कसेही उभे राहतात. या गर्दीनेच कोरोना वाढण्याची भीती आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे.
सचिन तिरपुडे, सहायक शिक्षक, सातोना.