एप्रिलमध्ये गुंडाळणार ‘आत्मा’ योजना
By admin | Published: December 22, 2015 12:40 AM2015-12-22T00:40:58+5:302015-12-22T00:40:58+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पादीत अन्न धान्याला मार्केटींग तथा सेंद्रिय शेती व अन्य शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा मळ यंत्रणे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
शासनाचा जलसिंचनावर भर : मार्गदर्शनाला पोरके ठरणार शेतकरी
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांच्या उत्पादीत अन्न धान्याला मार्केटींग तथा सेंद्रिय शेती व अन्य शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आत्मा मळ यंत्रणे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाचे शेतकऱ्यांचा आत्मा एप्रिल महिन्यात गुडांळण्याचा सुतोवाच केला आहे. यामुळे सिहोरा परिसरातील शेतकरी मार्गदर्शनाला मुकणार आहेत.
राज्य शासन शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी जलसिंचनावर अधिकाधिक भर देत आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांना आधार ठरत आहे. रोहयोतून शेतकऱ्यांना विहिर उपलब्ध करण्यात येत आहे. या विहीरीला सौर पंप गृहाची जोड दिली जात आहे. यामुळे विज बिल देयकांची कटकट संपणार आहे.
दरम्यान शेती व्यवसायात नविन तत्रंज्ञान, उत्पादीत अन्न धान्यांना मार्केटींग, शेती विषयक मार्गदर्शन या करिता जिल्हा प्रकल्पच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास यंत्रणा ‘आत्मा’ अतंर्गत शेतकऱ्यांना शिबिरांच्या आयोजनातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या यंत्रणेत तालुक्यात बिटीएम व एसएसएस असे दोन पदे कार्यरत आहेत. या यंत्रणेमार्फत गावात शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिरात शेतकऱ्यांना सेंद्रिय पध्दतीने विषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेत शिवारात नविन तंत्रज्ञान पध्दतीने आधुनिक शेती करण्यासाठी याच यंत्रणेमार्फत साहित्य पुरवठा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे समुह गठीत करण्यावर यंत्रणेचे अधिक भर दिला आहे. शेतकऱ्यांचे शेत शिवारात चला, या सुत्रांचा अवंलबन यंत्रणेने केला आहे. श्री पध्दतीतून शेती व्यवसायात शेतकऱ्यांना डेमो देण्यात कार्य यंत्रणेने केले आहे.
शेतकऱ्यांचे शेतात उत्पादीत होणाऱ्या अन्न धान्याला स्वंतत्र मार्केटिंग प्राप्त करुन देण्यासाठी यंत्रणा कार्य करित आहे. नागपूरात आयोजित होणाऱ्या तांदूळ महोत्सवात आत्मा ही यंत्रणा हिरीरीने भाग घेत असल्याने तांदुळ या अन्नाची महंती सांगण्यात येत आहे. दर्जेदार तांदूळ व गुणधर्म आदीचे विमोचन याच यंत्रणेमार्फत करण्यात येत आहे. उत्पादीत अन्न धान्याची गुणधर्म वाढीसाठी यंत्रणा शेतकऱ्यांचे सपंर्कात राहत आहे.
प्रत्येक गावात यंत्रणेमार्फत अभ्यास तथा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन होत असल्याने शेतकऱ्यांना ननीन तत्रज्ञानाची माहिती होत आहे. परंतु राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संपर्कात राहणाऱ्या ‘आत्मा’ या यंत्रणेला गुंडाळण्याचा सूतोवात केला आहे. एप्रिल महिन्याचे पहिल्याच तारखेला आत्मा चे ठोके बंद होणार आहे.
शेतकरी शेती विषयक मार्गदर्शनाला पोरके ठरणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सुर आहे. सिहोरा परिसरातील वैनगंगा व बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात वास्तव्य व शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आत्मा या यंत्रणेने नविन दिशा व संजीवनीची किरणे दाखविली आहेत. सेद्रिंय जैविक खते व शेती पध्दतीने फळे भाजी उत्पादन उत्तुंग भरारी घेतली आहे. उत्पादीत माल विक्रीला तिरोडा व सिहोरा गावात मोठी मार्केटींग सापडली आहे.
नागपुर पर्यंत भाजीपाला व तादुंळाने माजल मारली आहे. अज्ञानी शेतकऱ्यांने आत्मा ने नविन तत्रंज्ञानाचे बांघामृत पाजले आहे. सेंद्रिय शेतीने जुने दिवस दारात आणले आहे. परंतु ‘आत्मा’ गुंडाळण्यात येत असल्याने उत्तम प्रशिक्षणाला शेतकरी मुकणार आहेत.
यामुळे शेतकरी मार्केटिंगच्या शोधासाठी सैरवैर ठरणार आहेत. आत्मा या यंत्रणेला अधिक बडकट करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिल्या आहेत.
(वार्ताहर)