साकोली तालुक्यात २० हजार हेक्टरमध्ये पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:42 AM2019-07-08T00:42:32+5:302019-07-08T00:45:22+5:30
तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे.
संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यात खरीप हंगामाला जोमात प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीची कामे पुर्णत्वाकडे आहे. सध्या दमदार पावसामुळे चिखलणीच्या कामाला वेग आला आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ३७ टक्के कमीच पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. तर तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात बरसलेल्या पावसाच्या सरीनंतर खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध होती, अश्या शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र पºहे चार इंचीचे झाल्यावरही या शेतकºयांना पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा होती. अखेर आद्रा नक्षत्राच्या सहाव्या दिवशी पाऊस बरसताच चिखलणीची कामाला सुरुवात होऊन अन्य शेतकºयांनी पेरणीची कामे हातात घेतली. गत चार ते पाच दिवसात पाऊस आल्याने शेतकरी ही खरीप हंगामात व्यस्त दिसून येत आहे. साकोली तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त भागात धानाची लागवड केली जाते. चिखलणीची कामे झाल्यानंतर बळीराजा खत फवारणीच्या कामाला लागणार आहे.
यंदा मान्सून केरळ किनारपट्टीवर उशिराने दाखल झाला आहे. तसेच मान्सून सुरू व्हायच्या वेळेस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर 'वायू चक्रीवादळ' आले होते. त्यामुळे मान्सुन दक्षिण कर्नाटकमध्येच जास्त दिवस बरसला आहे. या सर्व कारणांमुळे जून महिन्यात कमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते ४ जुलै या कालावधीत सर्व तालुक्यांमध्ये सरासरी २३१.७ मिलिमीटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र, तुलनेने उशिरा सुरू झालेला पाऊस केवळ २०१.५ मिलिमीटर पडला आहे. या अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्याची लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यातील पेरणीचे काम अंतिम टप्यात आहे.
चौरास भागात भात पीक रोवणीला प्रारंभ
आसगाव चौ. : ज्याच्याकडे ओलीताची सोय आहे. विहिरीला पाणी आहे. त्या शेतकऱ्यांनी रोहणी नक्षत्रातच भात पिकांच्या पऱ्हे नर्सरी तयार करुन भरली. त्यांनी पंपाच्या सहाय्याने सिंचन करुन मेहनतीने पऱ्हे जगविले. त्यांच्या पऱ्हे नर्सरी रोवण्या योग्य झाल्यामुळे व आद्रा नक्षत्राचा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे चौरास परिसरातील १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रोवणीसाठी २० ते २५ दिवासचा कालावधी लागणार आहे. कारण पावसाची सुरुवात उशीरा सुरु झाल्यामुळे पऱ्हे तयार होण्यासाठी बराच अवधी लागणार आहे व पावसाची सुध्दा प्रतीक्षा करावी लागेल.