भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरीमुळे चिमण्या गायब

By admin | Published: April 19, 2015 12:39 AM2015-04-19T00:39:49+5:302015-04-19T00:39:49+5:30

धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे.

Sparrows disappeared due to mobile sounding mural | भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरीमुळे चिमण्या गायब

भ्रमणध्वनीच्या परमाणू लहरीमुळे चिमण्या गायब

Next

चिवचिवाट बंद : विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर
भंडारा : धुळीपासून आता चक्क परमाणू लहरी आणि कीटकनाशकाच्या प्रदूषणामुळे पशू पक्ष्यांवरसुध्दा विपरीत परिणाम होत आहे. पूर्वी पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत सतत चालणारा चिमण्याचा चिवचिवाट कायमचा बंद झाला.
शहरातील सिमेंटच्या जंगलामुळे पक्ष्यांचे निवारे दिसेनासे झाले आहेत. चिमण्यांपाखरासोबत नातीगोती जपणार्यांनी मात्र चिमण्यांचा सहवास मिळावा म्हणून पक्षीप्रेमी नागरिक घरावर कृत्रिम घरटे लावण्याचा उपक्रम राबवितात.
पशू पक्षी घरट्यातून बाहेर येत एकच कलह होत होता. तेव्हा पक्षांच्या किलबिलाटामुळे महिला मंडळी सुप्रभाती सडासारवण करीत होत्या. परंतु आता सूर्यवंशमचा जमाना आला. कुणालाही सडासारवण करण्याची गरज वाटत नाही. त्या भूपाळीसुध्दा काळाच्या पडद्याआड गेल्या. विज्ञानाने सर्वच क्षेत्रात प्रगती करुन मानवाला ऐहिक सुखाच्या विळख्यात सापडले आहे. परंतु तेवढेच दुष्परिणामसुध्दा वाढले, मानवी जीवन विविध आजाराने वेढला गेला. विकासाची प्रगती मानवी जीवनाला अडसर ठरत आहे.
निसगार्तील पशुपक्षी काळाच्या पडद्याआड जात आहे. जंगलात पिकावर होत असलेल्या विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे पक्ष्यांचे खाद्य अळयासुध्दा नाहीशा झाल्याने पशुपक्ष्यांवर उपासमारी येऊ लागली आहे.
ग्रामीण भागातील चिमण्या केवळ बोटावर मोजण्याइतक्याच राहिल्या आहेत. शहरी भागात सिमेंट रस्ते आणि मोठया इमारतींमुळे सिंमेटचे जंगल तयार झाल्याने शहरातील चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा झाला.
पर्यावरणवाद्यांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. भ्रमणध्वनीसुध्दा याला कारणीभूत असल्याचे काहींचे मत आहे. याकरिता काही पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी घरासमोर घरटे व पाण्याची व्यवस्था करुन चिमणी पाखरांना निवारा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Sparrows disappeared due to mobile sounding mural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.