पाच पोलीस अधिकारी व ५३ कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:55 AM2019-08-13T00:55:56+5:302019-08-13T00:56:30+5:30
नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
भंडारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक पी.बी. बानबले, पोलीस उपनिरीक्षक चौथनकर, ओ.पी. गेडाम, स्वप्नील निराळे, एम.एस. गोखरे या अधिकाºयांसह सहायक फौजदार विठ्ठल पाटील, गजेंद्र गोंडाने, लक्ष्मण संतापे, चालक सहायक फौजदार मोरेश्वर पेशणे, नरेंद्र मुटकुरे, पोलीस हवालदार सुनिल सैय्याम, देविदास बागडे, फुलचंद मेश्राम, दुशांत सुरनकर, विष्णू खंडाते, सुरेश मेश्राम, किसन मडावी, सुरेश भलावी, राकेश हेमके, सत्तराव हेमणे, सुनील राऊत, यादव काटेखाये, केशव फुलबांधे, पोलीस नायक भुमेश्वर सिंगाडे, पुरूषोत्तम गिरीपुंजे, कमलेश पडोळे, विनोद बोंदे्र, नवनीत जांभूळकर, महिला पोलीस नायक पूनम मेश्राम, संगिता मडावी, दिलीप भोयर, श्यामराव नेवारे, सुभाष गोंंधुळे, ब्रम्हानंद गावतुरे, आशिष तुमणे, रेखा मेश्राम, सचिन राऊत, नरेंद्र झलके, कैलास गायधने, आकाश वाढीये, दीपक सोनुने, विशाल लांजेवार, बाळकृष्ण पाठक, नितीन खराबे, भालचंद्र अंडेल, सविता पटले, प्रमोद चेटुले, योगराज घारड, नितीन बोरकर, प्रफुल्ल कठाणे, योगेश्वर वैरागडे, सचिन कापगते, जयतुरा काळे, सरीता मदारकर, अनिल राठोड, गजेंद्र लांबट, मयुरी सिंगनजुडे, पोर्णिमा कानेकर यांचा समावेश आहे.
पोलीस दलात अधिक चांगली कामगिरी करावी
पोलीस महासंचालकांचे पदक अधिकारी व कर्मचाºयांना प्रदान केल्यानंतर मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे म्हणाले, भंडारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उत्कृष्ठ कामगिरी करीत आहे. यापुढेही अधिकाधिक चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.