चांदपूरच्या विकासाला गती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:38 PM2018-10-16T21:38:11+5:302018-10-16T21:38:30+5:30
भंडारा जिल्ह्यात चांदपूर गावाची नंदनवन म्हणून ओळख आहे. या गावात विविध देवस्थान व पर्यटन स्थळ आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटन स्थळात अनेक पर्यटक दाखल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात चांदपूर गावाची नंदनवन म्हणून ओळख आहे. या गावात विविध देवस्थान व पर्यटन स्थळ आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटन स्थळात अनेक पर्यटक दाखल होत आहे. यामुळे परिसरातील अर्थव्यवस्था सावरण्यास मदत मिळत आहे. चांदपूर गावाचे विकास कार्यासाठी निधी खेचून आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी केले.
सातपुडा पर्वत रांगेच्या टेकडीवर असणाऱ्या चांद शॉ वली दरगाहाचे पायºया बांधकामाचे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दरगाह कमेटीचे अध्यक्ष रियाज अली सैयद होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, कादर अन्सारी, हेमराज लांजे, शकील कुरैशी, मानिक ठाकरे, इकबाल शेख, महेंद्र चौरीवार, फिरोज पठाण, राहुल लारोकर, कान्हा बर्वे उपस्थित होते. धनेंद्र तुरकर पुढे म्हणाले सातपुडा पर्वत रांगाच्या घनदाट जंगलात असणाºया चांदपूर गावात निसर्ग वैभव, हिंदू - मुस्लिम बांधवाचे देवस्थान आहेत.
या देवस्थानात लाखो भाविक दर्शनासाठी येत आहे. गाव आणि देवस्थानचे विकास कार्यासाठी राजकारण आड येवू नये. या गावातील वैभावाने देशाचे काना कोपºयात ओळख निर्माण केली आहे.
जागृत हनुमान देवस्थान चांद सां वली दरगाह, ऋषी मुनीचे आश्रम आणि पर्यटन स्थळ अशी सांगड असणाºया या गावाचे विकास कार्यासाठी एकाच व्यासपीठावर येण्याची गरज आहे.
चांद सां वली दरगाहचे पायºया बांधकामासाठी तीन लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याच गावात महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे हस्ते सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. गावाचे विकासात सातत्याने भर पडत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत तिर्थस्थळ पॅकेजचा कायदा या गावातील देवस्थानचे विकास कार्यायासाठी प्रयत्न करणार आहे.
राज्य शासनाला निधी मंजुरी करिता पाठपुरावा करण्यात येईल. या शिवाय सिहोरा परिसरातील गावांना विकासाचे एकसुत्रात बांधण्याचे प्रयत्न केली जाणार आहे. पर्यटन स्थळाचे विकास कार्याकरिता सहकार्याची भूमिका घेतली जाणार आहे. चांदपूरचे विकास करिता राज्य शासनाने जलद गतीने निधी मंजुरी करण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमाचे संचालन कादर अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन फिरोज पठाण यांनी मानले.