चालू आर्थिक वर्षाचा निधी वेळेत खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:30+5:302021-02-05T08:43:30+5:30
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू ...
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजित वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते. सभा सुरू होण्यापूर्वी भंडारा सामान्य रुग्णालयात झालेल्या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांना सभागृहाने मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
पालकमंत्री कदम म्हणाले, ‘धान खरेदी संपूर्ण झाली पाहिजे. शेतकऱ्यांची अडवणूक होता कामा नये. भरडाईबाबत ३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार आहे. कोविड काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन निधीमधून कोविडसाठी ठेवण्यात आलेल्या निधीचा आढावा यावेळी घेण्यात आला. आरोग्य यंत्रणेत सुधार होणे आवश्यक असून, लोकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे निर्देश नाना पटोले यांनी दिले. यंत्रणांनी मार्च २०२० अखेर २१५ कोटी ६९ लाख ३६ हजार रुपये खर्च केलेला आहे. वितरित तरतुदीशी खर्चाची टक्केवारी ९८.५४ टक्के एवढी आहे. प्रारूप आराखडा २०२१-२२ मध्ये शासनाने १५३ कोटी ८ लक्ष ६३ हजार रुपये लक्ष्य ठरवून दिले होते. कार्यवाही यंत्रणेकडून ३५७ कोटी ५१ लाख ३० रुपये रकमेचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत समितीने प्रारूप आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे यंत्रणेकडील अतिरिक्त मागणी २०४ कोटी ४२ लाख ६७ रुपये एवढी आहे.
जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत १८९ कोटी १९ लाख ६३ हजार नियतव्यय मंजूर असून, माहे डिसेंबरपर्यंत शासनाकडून संपूर्ण निधी प्राप्त झाला असून, सदर निधी कार्यवाही यंत्रणांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०२०-२१ अंतर्गत कार्यवाही यंत्रणेकडून पूनर्विनियोजन प्रस्ताव मागविण्यात आले होते. यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या २० कोटी ८३ लाख रुपयांच्या प्रस्तावास या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली.