गणेशोत्सव स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त सहभाग

By admin | Published: September 25, 2015 12:11 AM2015-09-25T00:11:52+5:302015-09-25T00:11:52+5:30

लोकमत सखी मंचतर्फे गणेश उत्सवानिमित्त आयोजित ब्युटी सेमिनार, मोदक स्पर्धा, गौरी आरस स्पर्धा, केशरचना स्पर्धेत सखींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Spontaneous participation in the Ganeshotsav competition | गणेशोत्सव स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त सहभाग

गणेशोत्सव स्पर्धेला सखींचा उत्स्फूर्त सहभाग

Next

सखी मंचचा उपक्रम : दिले विविध प्रशिक्षण
लाखनी : लोकमत सखी मंचतर्फे गणेश उत्सवानिमित्त आयोजित ब्युटी सेमिनार, मोदक स्पर्धा, गौरी आरस स्पर्धा, केशरचना स्पर्धेत सखींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
गणेश वंदना नृत्य सादरीकरणाने संगीता घोनमोडे यांनी सखींना उत्साहित केले. रुमा खंडाईत या सखीने मोदक साहित्यातून गणपती अष्टविनायकांचे दर्शन घडवून आणून दिले. तसेच श्रीगणेश प्रतिकृती मोदकापासून तैयार केली. वैशाली शिवणकर यांनी मोदकापासून गणपती तयार करून दाखविले. तृप्ती थानथराटे यांनी पंचामृत मोदक शालु लांजेवार व माया हटवार यांनी चवदार असे मोदक सखींसमोर सादर करून स्पर्धेत रंगत आणली. केशरचना स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमलता थोटे तर द्वितीय क्रमांक वैशाली ढेंगे यांना तर तृतीय क्रमांक संगीता मस्के यांनी प्राप्त केला. गौरी आरस स्पर्धेत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक लता वाघाये तर सारीका पारधी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. रिना वाघाये, गौरी आरस स्पर्धेत नंदीनी वाघाये, सृष्टी काळे यांनीही सुध्दा पारितोषीक मिळविले.
ब्युटी सेमिनारमध्ये भोंडे यांनी सखींना ‘मेकअप’बाबत घरगुती उपाय सांगितले. यात यासाठी दुध, दही, मध, लिंबू, म्हसुर दाळ, चनादाळ, हळद, केशर यांचा वापर कसा करायचा याबाबत टिप्स दिले. केसांसाठी जास्वंद तेल, मोगरा, गुलाब, जाई-जुई यापासुन निसर्गाशी नात टिकवून केसातील कोंडा व जंतुविरहित कडूलिंब, लिंबू, सिताफळ बी व पाने यांचे पासून तेल व बियांचा उपयोग हे शिकविले. केसांसाठी आवळा, पालक, आंबा, लिंबू हे पोष्टिक ठरतात. त्याचा आहारात वापर पपई याबद्दल सविस्तर माहिती देवून मेकअप, लिपिस्टीक, आपले नख याबद्दल सुध्दा सखींना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व आभार शिवानी काटकर यांना केले. यावेळी मीना माकडे, मिना मेश्राम, पल्लवी खेताडे, कविता गायधनी, छाया गायधनी, शोभा राघोर्ते, नलिनी पाखमोडे, वरंदू गिऱ्हेपुंजे, शिल वासनिक, शालू लांजेवार, प्रभा वेलखोडे, जयश्री कोहाडे, मदां निर्वाण, उज्वला वाघमारे, संगीता हटवार, रिना परेरा, प्रमीला पाखमोडे, जयश्री बावनकुळे व अन्य सखी मंच सदस्या उपस्थित होत्या. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous participation in the Ganeshotsav competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.