सखी महोत्सवात सखींचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:28 PM2017-12-31T23:28:54+5:302017-12-31T23:29:29+5:30
लोकमत सखी मंच साकोलीच्यावतीने भारत सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आॅनलाईन लोकमत
साकोली : लोकमत सखी मंच साकोलीच्यावतीने भारत सभागृहात सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला माजी खासदार नाना पटोले, साकोलीच्या उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, नगराध्यक्ष धनवंता राऊत, मानवाधिकार संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी, प्रदेश महिला अध्यक्षा ममता भोयर, शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा निलमा वालके, केवटे, अर्चना निंबार्ते, छाया पटले, वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उके, अखिलेश गुप्ता उपस्थित होते.
या कार्यक्रमात सखींनी विविध कला सादर केल्या. यामध्ये बाम्पेवाडा ग्रुपच्या महिलांनी शेतकरी नृत्याचे उत्तम प्रदर्शन करून सर्व पाहुण्यांची वाहवा मिळविली. उद्घाटनप्रसंगी सौम्या गुप्ता व स्नेहा कुळकर्णी यांच्या ‘नमो शिवशंकरा’ या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
एकल नृत्यामध्ये प्रथम क्रमांक नीलिमा कोडापे यांच्या मला जाऊ द्या या लावणीने द्वितीय संगीत पेंदाम यांच्या ‘प्रेमरतन धन पायो’ तर तृतीय प्रणिता तिडके यांच्या ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या नृत्याला मिळाला.
युगल नृत्यामध्ये रिना चौधरी व दुर्गा निखाडे यांच्या ‘चने के खेत में’ नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळविला. तनुजा हत्तीमारे व लता साखरवाडे यांच्या युगल नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सामूहिक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक भारती सोनवाने यांच्या नृत्याने, द्वितीय दिपा करंबे यांच्या रंग दे बसंती तर तृतीय क्रमांक जादूची झप्पी यांच्या ग्रुपच्या पल्लो लटके या रिमीक्स नृत्याने पटकाविले. नृत्यांमध्ये एकापेक्षा एक असे सादरीकरण करण्यात आले.
संगीता खुणे व पुष्पा कापगते यांच्या माऊली या नृत्याने जणू पंढरपूरचे दर्शन घडविले. अशा या अप्रतीम कार्यक्रमाचे परिक्षण नितू वासू गुप्ता व सुषमा कापगते यांनी केले. दुर्गा निखाडे, शामकला गडमडे, तनुजा हत्तीमारे, कल्पना नेवारे, भारती व्यास, वैशाली पाटील, उषा लांजेवार, कविता कांबळे, आरती तरजुले, स्वाती शहारे, स्नेहलता राऊत, दिव्या राऊत, संगीता चांदेवार ग्रृप बांपेवाडा महिला ग्रृप तसेच वडद, पळसगाव, परसोडी, बांपेवाडा, सानगडी, धर्मापूरी येथील महिलांनी सहभाग घेतला. यावेळी सर्व वॉर्ड संयोजिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुचिता आगाशे यांनी तर संचालन रजनी राखडे यांनी केले.
यावेळी माजी खासदार नाना पटोले, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी व ममता भोयर यांनी ‘लोकमत सखी मंच’ हे महिलांसाठी व्यासपीठ असल्याचे भाषणातून सांगितले. या कार्यक्रमासाठी शालू नंदेश्वर, रिता बोकडे, आभा खोटेले, मिनाक्षी आकनूरवार, लता द्रुगकर, रिता राऊत, दिपा करंबे, तृप्ती भोंगाडे, कला हटवार,प्रतिभा टेंभरे, ज्योत्स्ना रंगारी, कुंदा गायधने यांनी सहकार्य केले.