गोसेवा सद्भावना पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:15 PM2018-06-11T22:15:35+5:302018-06-11T22:15:35+5:30
गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर शनिवार ९ जूनला यात्रेचे भंडाऱ्यात आगमन झाले. मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद फैज खान हे या यात्रेचे नेतृत्व करीत असून संपूर्ण प्रवास पायी चालून केला जाते आहे, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर शनिवार ९ जूनला यात्रेचे भंडाऱ्यात आगमन झाले. मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद फैज खान हे या यात्रेचे नेतृत्व करीत असून संपूर्ण प्रवास पायी चालून केला जाते आहे, हे विशेष.
जवळपास वर्षभरापूर्वी म्हणजेच २४ जून २०१७ रोजी लेह येथून गोसेवा सद्भावना यात्रेला सुरुवात झाली. लेह, कन्याकुमारी, अमृतसर असा प्रवास या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार असून तब्बल १२ हजार किलोमिटरचा टप्पा गाठला जाणार आहे. दोन वर्षे कालावधीची ही यात्रा सध्या पहिल्या टप्प्यात असून यात्रेचे नेतृत्व करीत असलेले मुस्लिम राष्ट्रीय मंच, गोसेवा प्रकोष्ठचे राष्ट्रीय संयोजक महोम्मद फैज खान संपूर्ण प्रवास पायी करीत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. भारतीय देशी गोवंशाची सेवा, संरक्षण आणि संवर्धन, देशी गाईवर आधारित कृषी प्रोत्साहन, गाईच्या नावाने समाजात वाढणारे वैमनस्य दूर करण्यासाठी सद्भावना प्रस्थापित करणे, गोहत्येवर पूर्ण प्रतिबंधासाठी केंद्रात कायदा बनविण्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रोत्साहित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. ८ जून रोजी या यात्रेचे आगमन लाखनी येथे झाले. स्वामी विवेकानंद वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर संघचालक उमराव बावनकुळे, नगराध्यक्ष ज्योती निखाडे, उपाध्यक्ष माया निंबेकर, डॉ.राजहंस, नगरसेवक महेश आकरे, विक्रम रोडे, देवराव चाचरे, संदीप भांडारकर, फैजल आकबानी, प्रभूदास खंडाईत, पंकज भिवगडे उपस्थित होते. लाखनी येथील मुक्कामानंतर शनिवारी दुपारी १२ वाजता सद्भावना यात्रा भंडाºयात पोहचली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात खान यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष संजय एकापुरे, नगर परिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, नगरसेवक कैलाश तांडेकर, मंगेश वंजारी, मयूर बिसेन, बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक कुंभरे, मनीष बिछवे, प्रवीण उदापुरे, दिनकर गिरडकर, शैलेंद्र श्रीवास्तव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.