व्यंजन प्रशिक्षणाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: December 23, 2015 12:45 AM2015-12-23T00:45:31+5:302015-12-23T00:45:31+5:30
लोकमत सखी मंचतर्फे शहरातील विविध केंद्रावर व्यंजन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
ठिकठिकाणी आयोजन : लोकमत सखी मंचचा उपक्रम
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे शहरातील विविध केंद्रावर व्यंजन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखींना भाकरवडी, कचोरी, नानखटाई व विविध प्रकारचे केक शिकविण्यात आले. कार्यक्रमात आगामी होणाऱ्या सदस्य नोंदणीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
प्रगती कॉलोनीत कांता बांते यांच्या घरी व सिरसी येथे अंजु पिपरेवार यांच्या घरी नानखटाई व भाकरवडी शिकविण्यात आले.
वरठी येथे जैन मंदिरात विविध प्रकारचे केक, जवाहरनगर येथे संगिता भुजाडे यांच्या घरी व बेला येथे मनिषा इंगळे यांच्या घरी कचोरी व नानखटाई प्रशिक्षिका चित्रा झुरमुरे यांनी संखींना स्वादीष्ट व्यंजन शिकविले तसेच महत्वाच्या घरगुती टिप्स देखील दिल्या. केक प्रशिक्षणात मिल्क केक, चॉकलेट केक, पनीर केक व फु्रट केक तसेच केकवर आईसिंग कशी करावी हे सांगितले व विविध प्रकारचे डिझाईन सखींना करुन दाखविले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले आभार कांता बांते यांनी मानले. यावेळी अंजू पिपरेवार, संगिता सुखानी, संगिता भुजाडे व मनिषा इंगळे उपस्थित होत्या.(मंच प्रतिनिधी)