कबड्डी सामन्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:40+5:302021-02-24T04:36:40+5:30
हा अनुभव लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील मऱ्हेगाव येथे कबड्डी खेळाडूंनी अनुभवला. जीवनात प्रत्येकाची एक ओळख असते. स्वततः असलेल्या ...
हा अनुभव लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील मऱ्हेगाव येथे कबड्डी खेळाडूंनी अनुभवला. जीवनात प्रत्येकाची एक ओळख असते. स्वततः असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वयाचे बंधन नसते हेच यातून दिसून आले. मऱ्हेगाव हे असेच एक क्रीडाप्रेमी गाव आहे. गावाच्या सभोवताल नदीनाले असून मऱ्हेगाव पूरपीडित गाव म्हणून ओळखले आहे. सुपीक जमीन व मुबलक पाणी असल्याने गावकरी शेती करतात. शासनाने दुसऱ्या ठिकाणी जागा व घरे देऊनसुद्धा बराच गाव आजही जुन्या ठिकाणी स्थिरावलेला आहे. बच्चे कंपनी व तरुणाई मात्र हिवाळा व उन्हाळ्यात नदीनाल्याच्या पात्रात कबड्डीचा सराव करतात. याच कबड्डीच्या सरावातून पिढीजात कबड्डीचा वारसा पुढे चालवतात.
ज्येष्ठात उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून लेखराम डोये, शंकर उरकुडे, गोमा डोये, रामदास मदनकर, खुशाल राऊत, भिवाजी दुरुगकर, जनाजी ब्राह्मणकर, लक्ष्मण शेंडे, आत्माराम ब्राह्मणकर यांनी सहभाग नोंदविला. तर पंच म्हणून विलास शेंडे व पुरुषोत्तम दुरुगकर यांनी भूमिका निभावली.