धानाची उचल न झाल्याने फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:22 AM2021-07-12T04:22:53+5:302021-07-12T04:22:53+5:30
भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळी धान निघून तीन-चार महिन्यांचा काळ लोटूनही शासनाने शेतकऱ्यांच्या धानाची ...
भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळी धान निघून तीन-चार महिन्यांचा काळ लोटूनही शासनाने शेतकऱ्यांच्या धानाची उचल केली नाही. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरळीत होण्याची वाट बघत आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करण्यास आधी सरकारकडून विलंब झाला. केंद्र सुरू झाल्यावरही समस्यांचा ससेमिरा मात्र शेतकऱ्यांच्या मागे राहिला. केंद्र सुरू होताच, बारदाने नसल्यामुळे काही केंद्र बंद पडले, काही केंद्रांवरील बारदाने खराब निघाला, अशा एक ना अनेक प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये राज्य सरकारने देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे नियमित कर्जदारांना पन्नास हजार, तसेच जाहीर केलेला बोनस त्वरित देण्यात त्वरित देण्यात यावा. बारदान्याची व्यवस्था धारगाव आणि खुटसावरी धान खरेदी केंद्रावर त्वरित करण्यात यावी, अन्यथा ग्राम आंदोलन समिती जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचे कोंब फुटलेले धान नेऊन टाकेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. ज्या खरेदी केंद्राकडे स्वतःचे गोडाऊन नसतील, त्यांचे धान खरेदी केंद्र रद्द करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी ग्राम आंदोलन समितीचे संयोजक महेंद्र निंबार्ते, मंगेश वंजारी, संजय भोले, महेश गिऱ्हेपुंजे, सुनील खरवडे, दीपक वंजारी, सचिन पंचबुद्धे, सोनू मरघडे, कुमारने किंदर्ले, प्रकाश वंजारी, साहिल किंदर्ले, दिनेश वंजारी, देवा बोदेले, वाल्मिक वंजारी, मुकेश मेश्राम, आकाश वंजारी, उज्ज्वल गायधने, अनिल वंजारी, सुरेश वंजारी आदी उपस्थित होते.