SSC Result 2019; दहावीचा निकाल; भंडारा ६५.९९ तर यवतमाळ ६६ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 02:42 PM2019-06-08T14:42:19+5:302019-06-08T15:02:19+5:30
नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारा जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/ यवतमाळ : नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारा जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १७ हजार ५९० विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १६७६ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत तर ५०५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. ७४.५६ मुली उत्तीर्ण झाल्या. तर मुलांचे उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ आहे.
अमरावती विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यवतमाळ जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.३३ टक्के लागला आहे. अर्थात ३४ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. यवतमाळच्या अणे विद्यालयाचा विद्यार्थी तनय संजय वानखडे ९९.२० टक्के गुणांसह जिल्ह्यातून पहिला आला आहे.