एसटीला बंदी, जड वाहतुकीस संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:34 PM2018-12-23T22:34:28+5:302018-12-23T22:34:53+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे.

ST ban, heavy traffic opportunity | एसटीला बंदी, जड वाहतुकीस संधी

एसटीला बंदी, जड वाहतुकीस संधी

Next
ठळक मुद्देसावित्रींच्या लेकींचा पैदल मार्च : ८०० मीटर पायी प्रवास, शहरातून बसगाड्या नेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्रकार तुमसरात सुरु आहे. सकाळी शहरातूनच एसटी जाण्याची गरज आहे. शहरातून एसटी जाण्यास मनाई आदेश नाही तरी मागील अनेक महिन्यांपासून देव्हाडी मार्गावरील बसेस बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात.
देव्हाडी-तुमसर मार्गावरील सकाळच्या बसेस विनोबा भावे बायपास मार्गानेच बसस्थानकात जातात. त्यामुळे शहीद मंगेश बालपांडे चौकात देव्हाडी मार्गाने येणारे ग्रामीणचे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी येथे उतरतात. सदर चौकातून शाळा-महाविद्यालयाचे सुमारे ८०० ते एक किमी लांब अंतरावर आहेत. चिमुकल्या विद्यार्थ्यांची येथे खूपच गैरसोय होते. विद्यार्थीनींना ते कष्टदायक आहे. दुसरीकडे सकाळी जड वाहतूक शहरातून सर्रास सुरु राहते. सकाळी ८ ते ११ पर्यंत वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला होता अशी माहिती आहे. परंतु अन्य वाहने तर सर्रास शहरातून जातात.देव्हाडी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, देव्हाडा तथा मोहगाव, करडी येथून शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरीता तुमसर शहरात दररोज येतात. त्यांना पैदल मार्चचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी बस शहरातून नेण्याची विनंती बस वाहकास अनेकदा केली. त्याचाही येथे नाईलाज आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांनाही नियमानुसार कामे करावी लागतात. एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी असल्याने किमान सकाळी विद्यार्थ्यांना घेवून जाणारी बस शहरातून नेण्याची गरज आहे.

सकाळी देव्हाडी मार्गाकडून येणाºया बसगाड्या विनोबा भावे बायपास रस्त्याने येतांना विद्यार्थींनींनी तशी मागणी केल्यास शहरातून बसगाड्या आणण्यास काहीच हरकत नाही. याबाबत आमच्याकडे तशी लेखी मागणी कुणी केली नाही.
- युधिष्ठीर रामचौरे, आगार प्रमुख तुमसर आगार.
देव्हाडी मार्गाने येणाºया सर्वच बसगाडया शहरातून नेण्यात याव्यात. सकाळी शहरातून बसगाडया आणण्यात अडचण नाही. दिवसभर ला शहरातूनच जातात. इतर जड वाहतूक येथे चोवीस तास सुरु राहते. विद्यार्थ्यांना वेठीस धरता कामा नये, लेखी मागणीची वाट पाहण्याची गरजच काय? तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते तुमसर.

Web Title: ST ban, heavy traffic opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.