एसटी बस 40 फूट खोल पुलाखाली उतरली, 39 प्रवासी सुदैवाने बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:21 PM2020-03-04T14:21:08+5:302020-03-04T14:24:32+5:30

बसमधील ३९ प्रवासी सुदैवाने बचावले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. 

The ST bus 40 feet deep under the bridge in bhandara SSS | एसटी बस 40 फूट खोल पुलाखाली उतरली, 39 प्रवासी सुदैवाने बचावले

एसटी बस 40 फूट खोल पुलाखाली उतरली, 39 प्रवासी सुदैवाने बचावले

Next

वरठी (भंडारा) - तुमसरहून प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस रेल्वे ओव्हरब्रीजजवळ 40 फूट खोल खाली उतरल्याची घटना मोहाडी तालुक्यातील वरठी येथे घडली. बुधवारी (4 मार्च) दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या बसमधील 39 प्रवासी सुदैवाने बचावले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस प्रवासी घेऊन बुधवारी नागपूरकङे जात होती. वरठी नजिकच्या रेल्वे ओव्हरब्रीजजवळ अचानक दुचाकी बसच्या आडवी आली. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकाने पटकन ब्रेक मारले आणि बस पुलाजवळील उतारावरून थेट 40 फूट खोल खाईकडे उतरू लागली. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवत बस सरळ खाली उतरविली. या बसमधील 39 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला.

नशीब बलवत्तर म्हणून बस न उलटता सरळ खाईत जाऊन उतरली. हा अपघात दिसताच वरठीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे पाहून सर्वांना हायसे वाटले. यादरम्यान सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसने भंडाराकडे रवाना करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

corona virus : भारतात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार, विमानतळावरच कॅम्प

Coronavirus: इटलीहून आलेल्या १५ पर्यटकांना कोरोनाची बाधा; एम्सकडून दुजोरा

विद्या चव्हाण यांच्या सुनेचा खळबळजनक दावा, 'ब्लॅकमेल' करत असल्याचाही आरोप

Narendra Modi : 'मोदींची नाट्यछटा, अफवांनी प्राण तळमळला!'; शिवसेनेचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

मध्य प्रदेशात राजकीय भूकंप? भाजपानं आठ आमदारांना ओलीस ठेवलं; काँग्रेसचा गंभीर आरोप

 

Web Title: The ST bus 40 feet deep under the bridge in bhandara SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.