कंटेनरवर एसटी बस आदळली, १८ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:34 AM2021-03-25T04:34:14+5:302021-03-25T04:34:14+5:30

बॉक्स जिल्हा रुग्णालयाची तत्पर्ता या अपघाताची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी मिळाली. त्यांनी लगेच जिल्हा शल्यचिकीत्सक ...

ST bus collides with container, 18 passengers injured | कंटेनरवर एसटी बस आदळली, १८ प्रवासी जखमी

कंटेनरवर एसटी बस आदळली, १८ प्रवासी जखमी

Next

बॉक्स

जिल्हा रुग्णालयाची तत्पर्ता

या अपघाताची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी मिळाली. त्यांनी लगेच जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. फारूख रिजवी यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ सर्व डॉक्टरांना उपचारासाठी तात्काळ बोलावून घेतले. सुरूवातीला हा अपघात भीषण असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सर्व डॉक्टरांना रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. या डॉक्टरांनी सर्व जखमींवर उपचार केले. यावेळी यशवंत सोनकुसरे यांनी जखमींना मदत केली.

बॉक्स

एसटीची जखमींना मदत

एसटी बसला अपघात झाल्याचे माहित होताच विभागीय नियंत्रणक विनय गव्हाळे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वळसकर, मुख्ययंत्र अभियंता गजानन नागुलवार, भंडारा आगार प्रमुख फाल्गुन राखडे, बसस्थानक प्रमुख सारीका निमजे यांनी घटनास्थळी व त्यानंतर रुग्णालयात धाव घेतली. एसटीच्यावतीने किरकोळ जखमींना ५०० रुपये तर इतर जखमींना एक हजार रुपये तात्काळ देण्यात आली.

Web Title: ST bus collides with container, 18 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.