एसटी बसेस कोरोना फ्री; प्रवासी मात्र राहतात बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:10+5:302021-09-21T04:39:10+5:30

बॉक्स वर्षातून एकदा होणार कोटिंग एसटी महामंडळाने बसेसला अँटी मायक्रोबियल केमिकलचे कोटिंग करण्याचा निर्णय पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

ST Buses Corona Free; Travelers, however, live in peace | एसटी बसेस कोरोना फ्री; प्रवासी मात्र राहतात बेफिकीर

एसटी बसेस कोरोना फ्री; प्रवासी मात्र राहतात बेफिकीर

Next

बॉक्स

वर्षातून एकदा होणार कोटिंग

एसटी महामंडळाने बसेसला अँटी मायक्रोबियल केमिकलचे कोटिंग करण्याचा निर्णय पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाच्या खर्चात वाढ होणार असली तरीही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. केमिकल विषाणू विरोधक म्हणून काम करत असल्याने एसटी बसेसना अशा प्रकारचे कोटी करण्यात येणार आहे.

बॉक्स

बाधित व्यक्ती उठून गेल्यावरही धोका नाही, पण बाजूला असल्यास ..

एसटी बसचे ज्याप्रकारे केमिकलने कोटिंग होणार आहे. त्यामुळे कोरोना बाधिताचा स्पर्श झाल्यास कोरोनाचा धोका याठिकाणी राहणार नाही. बाधित व्यक्ती बाजूला बसला असल्यास त्यापासून प्रवाशांची सुरक्षितता होणार आहेच. मात्र एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे. यासोबतच मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

प्रवासी म्हणतात ...

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे एसटीने कोटिंग करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, केवळ कोटिंगच नव्हे तर बसेसची नियमित स्वच्छता तसेच ग्रामीण बसफेऱ्याही वाढवण्याची गरज आहे.

सागर मेश्राम, प्रवासी

एसटी महामंडळाने प्रवासीहिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोरोनामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या काही एसटीचे काही चालक-वाहक मास्क लावतच नाहीत. मात्र त्यांनीही मास्क लावलेच पाहिजेत. - विकास मुळे, प्रवासी

कोट

भंडारा विभागात असलेल्या एकूण ३६६ एसटी बसेसपैकी आतापर्यंत विभागातील १४४ एसटी बसेसचे अँटी मायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता राहणार आहे. तरीही प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे.

डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा

Web Title: ST Buses Corona Free; Travelers, however, live in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.