संचारबंदीतही कर्तव्य निभावल्याने आता पूर्ण क्षमतेने धावणार एसटी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:25 AM2021-06-03T04:25:26+5:302021-06-03T04:25:26+5:30
त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या एसटी बसेसची राज्य परिवहन महामंडळातर्फे अनेक बसेसची आजही दररोज दुरुस्ती करून तपासणी करण्यात येत ...
त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या एसटी बसेसची राज्य परिवहन महामंडळातर्फे अनेक बसेसची आजही दररोज दुरुस्ती करून तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून मार्च महिन्यापासून राज्यशासनाने प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता काही प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची लालपरी आता पुन्हा एकदा रस्त्यावरून धावू लागली आहे. परंतु गत वर्षभरात काहीच महिने बसेस सुरू राहिल्याने एसटी बसेस जागेवरच उभ्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट आल्याने एसटी बसेस धावल्याच नाहीत त्यामुळे एसटीला एकीकडे प्रवाशांचा फटका तर दुसरीकडे मोठा तोटा सहन करावा लागला. प्रवासी गाड्या बंदच असल्याने जादा नुकसान होऊ नये म्हणून एसटी महामंडळातर्फे मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. यासाठी भंडारा विभागात १९ मालवाहू ट्रक तयार करण्यात आले आहेत. हे सर्व मालवाहू ट्रक आज चांगल्या गतीने धावत आहेत. सोबतच उत्पन्नातही भर पडत आहे. प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस मात्र आता अनेक दिवसानंतर पूर्ण क्षमतेने दूर अंतरावर धावणार आहे.
बॉक्स
एसटी वर्षातील काहीच महिने रस्त्यावर
गेल्या वर्षी २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. साधारणपणे दसरा, दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये एसटी बसेस सुरू झाल्या होत्या. त्यानंतर या वर्षात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यातही बसेस सुरू होत्या. संचारबंदीसह कोरोनाकाळात अनेक दिवसांपासून एसटी बसेस जागेवर उभ्या असल्याने एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बॉक्स
चालकांच्या काळजीमुळे खर्च कमी
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत आगारातील एसटीचे कर्मचारी वाहनांची वेळीच योग्य ती काळजी घेतात. लहान-मोठा बिघाड असल्यास तो तत्काळ दुरुस्त केला जात असल्याने रस्त्यावर धावणाऱ्या या बसेसना त्यात विशेष असा खर्चही येणार नसल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात.
बॉक्स
सर्व बसेस सुस्थितीत
भंडारा विभागात अनेक आगारात गेले काही दिवस बसेस उभ्या असल्या तरी मात्र समोर समस्या येऊ नयेत यासाठी एसटीच्या चालकांतर्फे एसटी बसेस बंद असतानाही चालू करण्यात येत होत्या. यासोबतच नियमितपणे दुरुस्तीचे कामही सुरूच ठेवण्यात आले होते. प्रवाशांची ही लालपरी आजही पहिल्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे काही बसेसची दुरुस्ती, तपासणी केल्याशिवाय मार्गावर पाठवल्या जात नाहीत, अशी माहिती आहे.
बॉक्स
मालवाहू ट्रककडेही विशेष लक्ष
भंडारा विभागात संचारबंदीमुळे काही दिवस मानव विकास बसेस बंद होत्या. मात्र संचारबंदीतही मालवाहतूक सुरू असल्याने एसटीच्या उत्पन्नात भर पडली आहे. आजही अनेक कंपन्यांकडून मालवाहतुकीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बॉक्स
मी लालपरी बोलतेय ....
एसटी महामंडळाच्या बसेसमुळे ग्रामीण भागातील जनतेला विशेषकरून चांगला आधार मिळतो. अनेकदा एसटी बंद असल्यानंतरच अनेकांना एसटीची किंमत कळते. खासगी वाहतूकदार प्रवाशांशी कशी अरेरावी करतात, कशी लुुबाडणूक करतात हे कोरोनाकाळात एसटी बंद असल्यावर अनेकांना अनुभव आला. सर्वसामान्यांची लालपरी टिकली पाहिजे यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा.
कोट
संचारबंदीच्या काळात एसटी बसेस जरी उभ्या असल्या तरी मात्र एसटीतर्फे बसेसची देखभाल दुरुस्ती नियमितपणे सुरूच होती. वरिष्ठांच्या निर्देशानुसार बसेसच्या दुरुस्ती सोबतच इतर सर्व नियमित कामकाज एसटी कर्मचाऱ्यांकडून सुरूच होते. आगारातील बसेस चालकांकडून सुरू केल्या जात होत्या. आजही बसेसची दुरुस्तीसह आवश्यक ती कामे सुरूच आहेत.
प्रशांत हुलके, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, भंडारा