एसटी कर्मचाºयांचे मुंडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:12 AM2017-10-21T00:12:36+5:302017-10-21T00:12:47+5:30
एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एस.टी. कर्मचाºयांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला असून खाजगी प्रवाशी गाडयांकडून त्यांची आर्थिक लूट सुरु आहे.
मागील चार दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. तुमसर ते भंडारा येथील भाडे खाजगी प्रवाशी गाडी ३० रुपये घेत होते ते सध्या ८० रुपये घेत आहेत. प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. बुधवारी तुमसर येथील संपकर्ते एसटी कर्मचाºयांनी मुंडन करुन शासनाच्या निषेध नोंदविला.
तुमसर आगार भंडारा विभागात नफा मिळवून देणारा आगार आहे. मागील चार दिवसांपासून तुमसर आगारात शुकशुकाट दिसत आहे. प्रलंबित मागण्याकरिता एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. याची झळ सर्वसामान्य प्रवाशांना बसली आहे.
सर्वसामान्य प्रवाशी तथा एसटीचे कर्मचारी यांची दिवाळी अंधारात गेली तर दुसरीकडे खाजगी प्रवाशी गाडी मालकांची दिवाळी मोठ्या आनंदात जात आहे. किमान ५० रुपये प्रवाशी भाडे येथे खाजगी प्रवाशी गाडी मालकांनी ठेवले आहे. हे सर्व प्रशासन मूग गिळून पाहत आहे. त्यांनाही भाडे आकारणीचे नियम आहेत. परंतु त्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. अक्षरक्ष: कोंबून प्रवाशांना नेले जात आहे. अपघाताची शक्यता नक्कीच आहे.
तुमसर आगाराला दरदिवशी सुमारे पाच लाखांचे आर्थिक नुकसान होत असून तुमसर आगारात सुमारे ८० बसगाड्या मागील चार दिवसांपासून उभ्या आहेत.
रेल्वेगाडीत सध्या प्रचंड गर्दी दिसत असून नागपूर-गोंदिया दरम्यान अतिरिक्त प्रवाशी रेल्वेगाडी १८ ते २३ आॅक्टोबर दरम्यान धावत आहे. परंतु ग्रामीण भागात जाण्याकरिता एसटीची आवश्यकता नक्कीच आहे. संधीचा फायदा घेणाºया खाजगी प्रवाशी गाड्यांच्या हालचालीवर प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.