एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतन करार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:32 PM2018-02-17T22:32:46+5:302018-02-17T22:33:05+5:30
विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : विविध समस्यांमुळे एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची दैनावस्था झाली आहे. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मागील दिड वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतन करार सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर त्वरित देण्यात यावा, यासह प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा विभागाच्या कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फेत मुख्यमंत्र्यांना व विभाग नियंत्रकामार्फेत एस.टी.चे व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
एस.टी. महामंडळातील संघटनांनी दिवाळीत चार दिवसीय बेमुदत संप पुकारला होता. परंतु सरकारने न्यायालयीन कचाट्यात ओढून कर्मचाऱ्यांची पगारवाढ रेंगाळत ठेवण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. महामंडळ तोट्याचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांची पगारवाढ रोखून धरत आहे. परंतु तुटपुंज्या वेतनात कर्मचाऱ्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे. मागील दिड वर्षांपासून रेंगाळत असलेला वेतन वाढीचा तिढा लवकर सोडवावी, या मागणीसाठी शुक्रवारला विश्रांतीवेळात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने भंडारा विभागीय कार्यालयासमोर 'ढोल बजाव, शासन जगाओ' अंतर्गत निदर्शने करण्यात आली. या आंदोलनातून राज्य परिवहन कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, परिवहन कर्मचाºयांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, मागासवर्गीयांचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र बंद करावे, ग्रामीण भागातील लोकवाहीणी असून शिवशाही बसेस न घेता लाल बसेस खरेदी करण्यात याव्यात, खाजगी बसेस बंद करून महामंडळात सुधारणा करण्यासाठी शासनाने बजेटमध्ये तरतूद करावी, कास्ट्राईब संघटनेसोबत दर तीन महिन्यांनी घेण्यात येणारी त्रैमासिक बैठक शासनाच्या आदेशानंतरही घेण्यात येत नाही, ती नियमितपणे घेण्यात यावी, मागासवर्गीय कर्मचाºयांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यात यावे, अशा अनेक न्याय मागण्यांसाठी कास्ट्राईब संघटनेच्यावतीने राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्यावतीने भंडारा विभागीय कार्यालयासमोर ढोल वाजवून शासनाला आपल्या न्याय मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप घोडके, सचिव प्रशांत लेंडारे, कार्याध्यक्ष विजय नंदागवळी, प्रशांत भोयर, अशोक भोयर, सोहन मेश्राम, सचिन गजभिये, रवि मुल, मुकेश वाहणे, सुरेश साखरे, गौरव खापर्डे, निशांत भोयर, प्रवीण शाहू, आनंद मोटघरे, निशिकांत मोटघरे, विजय बांगर, सुरेश शेंडे, विमेश खोब्रागडे, पंकज वानखेडे, कमलेश मेश्राम, संतोष ठवकर, प्रशांत चिमणकर, सचिन महाजन, भोजराज मसराम, विपीन बोरकर, ऋषिकेश धमगाये, महेंद्र मोरे, राजु मेश्राम, मिनल शहारे, शुभांगी बोरकर, अस्मिता चवरे, लतीश नारनवरे, विपीन बोरकर, सुरेश राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.