एसटीला अवैध वाहतुकीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:49 AM2019-03-04T00:49:44+5:302019-03-04T00:52:16+5:30

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .

ST Traffic Traffic | एसटीला अवैध वाहतुकीचा फटका

एसटीला अवैध वाहतुकीचा फटका

Next
ठळक मुद्देमहसूल बुडतोय : कारवाई मात्र शून्य, जिल्ह्यात अवैध वाहतुकीला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी विभागाला सध्या अवैध वाहतुकीचा सामना करावा लागत असून खासगी वाहनचालक बस वेळेवर येत नसल्याच्या संधीचा फायदा उठवत बसस्थानकातून प्रवासी पळवत आहेत. याचा फटका एसटी विभागाला बसत असून यावर पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे .
परिवहन विभागाकडून विद्यार्थांसह, वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या योजना राबवल्या जात असल्या तरी प्रवासी वाढीसाठी मात्र एस टी विभागाला कसरत करावी लागत आहे भंडारा जिल्हयात एस टी ची चार आगारे आहेत. अनेक विभागातील ग्रामीण बसफेऱ्या अनियमित होत असल्याने नाइलाजास्तव प्रवासी खाजगी वाहतुकीकडे वळत आहे त्याचाच परिणाम एस टी ला लाखो रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. एस टी विभागाकडून अनेक जाहीरीतींद्वारे प्रवाशांना जागृत करण्याचे काम सुरु असले तरी अधिकाऱ्यांचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत यासाठी नागरिकांनी स्वत दक्षता घ्यावी.
तालुकास्तरापासून ते जिल्हास्तरापर्यत जवळपास सर्वच ठिकाणी काळीपिवळी, तीन ते चारचाकी आॅटो यासारख्या वाहनांतून ही अवैध वाहतूक सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी, जवाहरनगर, साकोली यासारख्या प्रमुख महामार्गावर अवैध वाहतुक नित्याचीच बनली असून अनेक प्रवाशांना यापुर्वीही नाहक जीव गमवावा लागला आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र तिर्थस्थळावर यात्रा भरत असते. या महाशिवारात्रीच्या पर्वावर सर्वच बसस्थानक परिसरात भाविकांची गर्दी वाढत असल्याने खाजगी वाहनचालक प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून क्षमतेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहतूक करत आहेत बरेच प्रवासी तर दाराजवळ लोंबकळत असतात बºयाचदा तर चालकांच्या अरेरावीपणामुळे प्रवाशांना मध्येच रस्त्यात उतरवण्याचे प्रकार घडले आहेत.
दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांमुळे चालकाला नीट गाडीसुध्दा चालविता येत नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरुन वाहतूक होत आहे. भरधाव प्रवाशी वाहतुकीमुळे मोठ्या दुर्घटना होण्याचा धोका वाढत आहे.
अवैध वाहतुकीला पोलिसांनी वचक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.

Web Title: ST Traffic Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.